योध्दा महिला मंच व पालवी लेडीज टेलर यांच्या वतीने "बाईपण भारी देवा" चित्रपटाचे मोफत आयोजन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 13, 2023

योध्दा महिला मंच व पालवी लेडीज टेलर यांच्या वतीने "बाईपण भारी देवा" चित्रपटाचे मोफत आयोजन...


योध्दा महिला मंच व पालवी लेडीज टेलर यांच्या वतीने "बाईपण भारी देवा" चित्रपटाचे मोफत आयोजन...
बारामती(प्रतिनिधी): - सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या "बाईपण भारी देवा" हा मराठी चित्रपट महिला वर्गामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.  महिलांच्या कार्यकर्तुत्वावर भाष्य करणारा अनेक दिवसानंतर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला महिलावर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलून धरले आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती आणि परिसरातील महिलांसाठी योद्धा महिला मंच आणि पालवी लेडीज टेलर यांच्या वतीने 150 महिलांना चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले होते.
   यावेळी रोजच्या दैनंदिन जीवनातले काम-धावपळ सोडून महिलावर्ग उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. बारामती मधील तारा थेटर मध्ये गुरुवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी एक च्या शोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी पालवी लेडीज टेलर, संतोष शूज, हॉटेल सनलँड, यांच्यातर्फे विशेष सहकार्य करण्यात आले होते.  या उपक्रमाचे आयोजन  योद्धा प्रोडक्शन संचलित योद्धा महिला मंच च्या वतीने करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment