*बारामतीच्या वर्षा लोणकरचा एमपीएससी परीक्षेत राज्यात ६८ वा क्रमांक*
बारामती : बारामती शहरातील कु. वर्षा गणपत लोणकर (रा. कसबा, बारामती) हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालयाच्या क्लार्कपदासाठी घेतलेल्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये ६८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
२०१८ साली इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाली. नंतर खासगी नोकरी न करता लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर्षा ही परीक्षा उत्तीर्ण झाली. वर्षाने प्राथमिक शिक्षण बारामतीतील शारदा संकुलात तर अभियांत्रिकीचे शिक्षण माळेगावातील शिव विद्याप्रसारक मंडळात पूर्ण केले आहे.
कु.वर्षा गणपतराव लोणकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय क्लार्क या पदी राज्यात मुलींमधून 68 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल शिवश्री असलम तांबोळी (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती शहर) यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment