पुणे:- ग्रामीण डाक विभागा अंतर्गत दिनांक १८.०७.२०२३ ते २०.०७.२०२३ दरम्यान “महिला सम्मान बचत पत्र” गुंतवणुकी साठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री बी पी एरंडे अधिक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी दिली.
सदर योजना दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध आहे. सदर योजना हि
महिला व मुलींकरता उपलब्ध असून त्याची मुदत दोन वर्ष आहे. सदर बचत प्रत्रात किमान रु.१०००/-पासून कमाल रु. दोन लाख (रु १०० च्या पटीत) गुंतवणूक करता येईल. एका महिलेच्या नावावर कमाल रुपये दोन लाखांपर्यंत किती हि बचतपत्र घेता येतील पण दोन बचत पत्रांमध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे. व्याजदर प्रती वर्षी ७.५% एवढा असून व्याज चक्रवाढ पद्धतीनी आकारले जाईल. सर्व
महिलांनी व पालकांनी आपल्या मुलीच्या नावे सदर महिला सम्मान बचत पत्र घ्यावे.तसेच मागील आर्थिक वर्षा मध्ये पुणे ग्रामीण विभागा अंतर्गत रुपये ३९६/- मध्ये रुपये १० लाखांचे
२५००० अपघाती विमा उतरवण्यात आले होते तरी आता त्याची मुदत संपत आली आहे त्यासाठी सर्वाना पुन्हा आव्हान करण्यात येते की, आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन रुपये ३९६/- वार्षिक हप्त्यामध्ये १० लाखांचा अपघाती विमा पुनर्जीवित करून घ्यावा तसेच डाक विभागाच्या सामान्य सेवा केंद्र मार्फत सर्व शेतकर्यांनी आपल्या पीकाचा, केवळ एका रुपयामध्ये पीक विमा काढून प्रधानमंत्री पीक
विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री एरंडे यांनी केले.
No comments:
Post a Comment