जामखेड:-पोलीस कर्तव्य बजावत असताना किती गोष्टीना सामोरे जावे लागते हे नुकताच घडलेल्या घटनेवरून दिसून याबाबत समजलेली माहिती अशी की,जामखेड शहरातील तपनेश्वर येथे कारचालकाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध
सुरु केला. खर्डा रोडवरील एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले.आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली. यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले.दरम्यान आरोपींनी पोलीसांवर पिस्टल रोखली.स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीच्या
पायावर गोळीबार केला. यानंतर तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांचे सहकारी आरोपींना ताब्यात घेत असताना आरोपींसोबत झटापट झाली. याच दरम्यान एका आरोपीने पोलीसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या पायावर गोळीबार करुन तीनही आरोपींना ताब्यात घेतले. जखमी झालेल्या आरोपीवर नगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत जामखेड पोलीस ठाण्याचे
पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली आहे.बुधवारी (दि. 19 ) मध्यरात्री 12.10 च्या सुमारास आरोपी प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे (सर्व रा. सारोळा, ता. जामखेड) यांनी शहरातील तपनेश्वर रोड येथे अदनान जर शेख (रा. तपनेश्वर रोड, जामखेड)
यांच्या डोक्याला पिस्टल लावले. शेख यांच्या
ताब्यातील अर्टिगा गाडी (एमएच 12 केटी
4795) चोरी केली.पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात आयपीसी 307, 353, 332, 34 तसेच आर्म अॅक्ट नसार गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment