खळबळजनक...इंस्टाग्रामवरून ओळखी चा फायदा घेत अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत शारीरिक संबंधासाठी दबाव..
नागपूर :- सोशल मीडिया, वॉट्सएप इन्स्टाग्राम,फेसबुक अश्या वेगवेगळ्या अकाऊंट वरून महिला, युवतींना जाळ्यात अडकून त्यांना गैरफायदा घेत अत्याचार केल्याचा घटना घडत असताना नुकताच इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या प्रियकराने हॉटेलात नेऊन शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. प्रेयसीने नकार दिल्यानंतर तिला प्रियकराने अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली.त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे केले.याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवतीशी चाळे
करणाऱ्या आरोपीस पाचपावली पोलिसांनी अटक केली.शरद भोमदेव वर्मा (२१, रा.नयापूरा, प्रेमनगर, झेंडा चौक)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २२
वर्षाच्या युवतीची ओळख आरोपी शरदसोबत एका वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरून झाली. आरोपी शरद हा मॅक्सी ऑटो चालवितो. तर युवती डीएमएलटीला शिकत आहे.ओळख झाल्यानंतर आरोपी तिच्याशी नियमित 'चॅटींग' करीत होता.
तो तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावित होता. परंतु युवती त्याला नकार देत होती. २० जुलैला युवती सिताबर्डी येथे गेली असता आरोपी शरद मॅक्सी ऑटो घेऊन तिच्या जवळ आला. त्याने तिला ऑटोत बसण्यास सांगितले असता तिने
नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचे अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे ती ऑटोत बसली.आरोपी तिला पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका
हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. आरोपीने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली.युवतीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करून शिविगाळ केली. तिचा फोन जमिनीवर आपटून नुकसान केले. तरुणीने लगेच हॉटेलमधून पळ काढला
आणि घर गाठले. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला.त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
No comments:
Post a Comment