उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती सायकल रेस बक्षीस समारंभ ना. संजय बनसोडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न... बारामती:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती सायकल रेस बक्षीस समारंभ ना.संजय बनसोडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाला तसेच महा रक्तदान शिबिरालाही भेट दिली व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ना. संजय बनसोडे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल बारामतीतील बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार नवनाथ बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष, यांनी केला त्याप्रसंगी रविराज खरात आर के ग्रुप ,अजित कांबळे माजी उपसरपंच ग्रामपंचायत मेडद,सुशांत जगताप संचालक बारामती दूध संघ,निलेश मोरे मा उपाध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस, अभिजीत चव्हाण माजी नगरसेवक, गणेश सोनवणे माजी नगरसेवक ,सनी देवकाते, मिलिंद मोरे, करण इंगुले , संदीप कडाळे, विशाल गायकवाड खजिनदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती,सागर शीलवंत,संकेत शिंदे, अभिजीत पवार व समाज बांधव उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नामदार संजय बनसोडे यांच्या रूपाने बौद्ध समाजातील व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिल्याबद्दल दादांचे देखील समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment