पुणे: - विकास कामाची होत असलेली घाई गडबड व त्यातून काही कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळाले तर अनेक कामे पुन्हा पुन्हा केली जात आहे कारण नियोजनाचा अभाव की जाणून बुजून लाखो रुपये वाया घालविले जात आहे अशीच चर्चा नागरिक करताना दिसत आहे,अश्या वेळी जर संबंधित ठेकेदारावर कारवाई करता आली किंवा दंड आकारला तर किती बरं होईल असो, तर काही ठिकाणी ठेकेदार करत असलेल्या कामाबाबत माहिती पुढे आली समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकल्यानंतर दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पडल्याने पाणी पुरवठा विभागाने ठेकेदारास एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.एल अँड टी कंपनीकडून समान पाणी पुरवठ्याचे काम शहरात केले जात आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदल्यानंतर तो पुन्हा सुस्थितीत आणणे आवश्यक आहे. या ठेकेदार कंपनीतर्फे औंध येथील आयटीआय रस्त्यावर ८१४ मिमीची
जलवाहिनी टाकण्यात आली.त्यानंतर सुमारे ४० मीटर लांबीचा रस्ता खचून ठिकठिकाणी
खड्डे पडले. १० दिवस उलटून गेले तरीही हे खड्डे
बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करूनही रस्ते दुरुस्ती केलेली नाही.त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने या ठेकेदारावर महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवला आहे.त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने या ठेकेदारावर महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवला आहे.
प्रतिदिन १० हजार प्रमाणे १ लाख रुपयांचा दंड
ठोठावण्यात आला आहे. हा प्रस्ताव अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप सादर केला होता, त्यास पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंजुरी दिली आहे.समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत रस्ता खोदल्यानंतर
संबंधित रस्ता ठेकेदाराने चांगल्या दर्जाचा करणे आवश्यक आहे. औंध येथे काम योग्य पद्धतीने न झाल्याने ठेकेदाराला १ लाख रुपयांचा दंड केला आहे. ही रक्कम बिलातून वसूल केली जाईल असे अनिरुद्ध पावसकर, प्रमुख पाणी पुरवठा विभाग यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment