पुणे:-४०० किलोंच्या गांजाचे हे प्रकरण आहे असल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आले या प्रकरणात आंध्रप्रदेशातील गांजा तस्करी प्रकरणी पुण्याच्या गुन्हे शाखेने बारामतीतून फिरोज अजिज बागवान याला ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. ४०० किलोंच्या गांजाचे हे प्रकरण आहे.या प्रकरणात ४०० किलो गांजा पोलिसांनी पकडून अलुरी सितारामराजू जिल्ह्यातील गुंद्रमेता (ता.मुंचिंगपुट) येथील सिमाद्री रामचंद्र पाडल यास ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यातील
सहआरोपी फिरोज अजिज बागवान हा मात्र फरार झाला. त्याच्याविरोधात तेथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला व पुणे पोलिसांना याची माहिती देण्यात आली,दरम्यान लोणावळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना फिरोज हा बारामतीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने बारामतीत सापळा रचला व फिरोज यास ताब्यात घेऊन अटक केली.कारवाई ७ जुलै रोजी करण्यात आली.या कारवाईत पोलिस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, फौजदार अभिजीत सावंत, सहायक फौजदार हनुमंत पासलकर,बाळासाहेब कारंडे, हवालदार अभिजीत एकशिंगे,स्वप्नील अहिवळे, हेमंत विरोळे यांनी सहभाग घेतला असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment