उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त यादगार सोशल फाउंडेशन च्या वतीने विधायक उपक्रम.. बारामती:- मा.ना.अजितदादा पवार(उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)यांच्या वाढदिवसानिमित्त यादगार सोशल फाउंडेशन च्या वतीने विधायक उपक्रम अंतर्गत बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शारदा प्रागंण,येथे आयोजित रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
याप्रसंगी रक्तदान करणारे रक्तदाते सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावणारे पदाधिकारी,नगरसेवक तसेच कार्यकर्ते यांना सकाळपासूनच अल्पोपाहार,चहा, जेवण,बाटलीबंद पाणी इत्यादी चे आयोजन यादगार सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते.
याउपक्रमा संदर्भात अधिक माहिती देताना यादगार सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हाजी, फिरोजभाई अजिजभाई बागवान,यांनी सांगितले मा.ना.*श्रीअजितदादा पवार व पवार कुटुंबिये नेहमीच 80%समाजकारण व 20% राजकारण करत विकासाची दिशा दाखवितात हाच आदर्श घेऊन यादगार सोशल फाउंडेशन ची सामाजिक वाटचाल ही वृक्षारोपण, सामुदायिक विवाह,वन्य प्राण्यां करिता पानोटे, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, विविध राष्ट्रीय सण व महापुरुषांच्या जयंती निमित्त नेहमीच विधायक उपक्रम राबविण्यात येत आसतात यावर्षी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.जय पाटील, यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली मा.ना.अजितदादा पवार च्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात सहभागी होणारे शहरातील *सर्वच पदाधिकारी,नगरसेवक, कार्यकर्ते व रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना अल्पोपाहार, ५७६० पाण्याचे बॉटल्स , चहा,जेवण यांची सोय करण्यात आली सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी यादगार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज अजिजभाई बागवान, मा.नगरसेवक अमजद अजिजभाई बागवान, अन्सारभाई आतार , जुबेरभाई आतार, इरफान बागवान, दादा मोडक, रियाजभाई बसरकोड, जब्बार बागवान फिरोज ल. बागवान,जीशान फरहान अमन इत्यादी फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment