खळबळजनक..फायनान्स चे हप्ते साठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून नवरा बायकोची आत्महत्या..? इंदापूर:-महागाईचा भडका व बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आले असताना डोक्यावर कर्जाचा डोंगर व नुकताच कोरोना कसाबसा जिव वाचवून उभा राहण्याचा मार्गावर असताना थकलेले बँक व फायनान्सचे हप्ते यामुळे त्रस्त होऊन अनेकांचे बळी गेले तर हप्ते वसुलीसाठी होत असलेली मानसिक त्रास ,गुंडगिरी यामुळे नाईलाजाने आत्महत्या करण्यापलीकडे मार्ग न उरल्याने अनेक जण जीवानिशी मुकले अशीच एक घटना नुकताच घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की, इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 714 / 2023 भा.द.वि. कलम. 306.34 नुसार फिर्यादी वसंत आप्पा माने वय 75 वर्ष धंदा शेती रा. लुमेवाडी (निंबोडी) ता. इंदापुर जि. पुणे.यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी बाळासाहेब पाटोळे पुर्ण नाव माहित नाही आणी त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक 26/06/2023 रोजी रात्री 11/40 वा. चे पुर्वी मौजे लुमेवाडी गावचे हद्दीत राहते घरामध्ये अँगलला तसेच दिनांक 27/06/2023 रोजी रात्री 10/00 ते दिनांक 28/06/2023 सकाळी 07/45 वाजताचे दरम्यान लुमेवाडी गावचे हद्दीत मयत नामे सुलभा संतोष माने हिने तीचे राहते घरामध्ये अँगलला स्कार्पच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे व दिनांक 27/06/2023 रोजी रात्री 10/00 ते दिनांक 28/06/2023 सकाळी 07/45 वा. दरम्यान संतोष महादेव माने यानेही त्याचे राहते घरामध्ये अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तरी झालेला प्रकार हा यातील मयताचे ताब्यात असणारी टाटा मोटर्स फायनान्स लिमीटेड पुणे कंपनीची ZEST XE नं. MH 42 AQ 9945 या गाडीचे 9 से 10 हप्ते भरले नसल्याने ती गाडी ओढुन घेवुन जाताना यातील आरोपी.क्र. 1 ते 4 यांनी दिलेल्या मानसीक व आर्थीक त्रास दिल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने सुलभा संतोष माने वय 40 वर्षे व संतोष महादेव माने वय 45 दोघे रा. लुमेवाडी (लिंबोडी) ता. इंदापुर जि. पुणे. यांनी त्यांचे राहते घरी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. वगैरे मजकुरची फिर्याद बावडा आकस न 324/2023 ने आल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल करून पुढील तपास स.पो.नि. पाटील हे करीत आहेत.
Post Top Ad
Monday, July 17, 2023
Home
इंदापूर
ताज्या घडामोडी
खळबळजनक..फायनान्स चे हप्ते साठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून नवरा बायकोची आत्महत्या..?
खळबळजनक..फायनान्स चे हप्ते साठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून नवरा बायकोची आत्महत्या..?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment