लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मूकबधिर शाळेतील विध्यार्थ्यांसाठी स्नेह भोजन
बारामती दि.२४: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जय लहुजी फ्रेंड सर्कल यांच्या वतीने कऱ्हा वागज येथील निवासी मूकबधिर शाळेतील विध्यार्थ्यांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील,बारामती सहकारी बॅंकचे अध्यक्ष सचिन सातव,शुभम अहिवळे यांनी मनोगत व्यक्त करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जय लहुजी फ्रेंड सर्कल ने आयोजित केलेल्या उपक्रमाचं कौतुक करून या पुढे देखील अशाच विधायक उपक्रमांनी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव,माजी उपनगरध्यक्ष विजय खरात,माजी नगरसेविका अनिता जगताप,मोहन इंगळे,जांभगावचे सरपंच समाधान गायकवाड,प्रतिक जोजारे,माजी नगरसेवक अभिजीत काळे,विक्रम लांडगे,सोमनाथ पाटोळे,ॲड.अमृत नेटके,संजय वाघमारे,दिनेश जगताप,संजय भोसले,पप्पू खरात,अमर अवघडे,राहुल गायकवाड यांच्यासह आदी समाजबांधव उपस्थित होते.
जय लहुजी फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष केदार पाटोळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता खरात,विकास पाटोळे,अजय खरात,आकाश खुडे,योगेश कांबळे,किरण कसबे,रोहित भोसले,दिपक लोंढे,कुणाल कसबे,बाबू खरात,सोनू गायकवाड,अविनाश खरात,आकाश खंडाळे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment