धक्कादायक.. अल्पवयीन मुलीवर बलात्कार
करणाऱ्या विकृत इसमाने अल्पवयीन मुलावर
पुणे:-माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडत असल्याचे उदाहरणे पाहत असताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या विकृत इसमाने प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका १६ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्याचवेळी मनोरुग्णालयातील सिस्टर व ४ गार्ड यांनी या मुलाला भुलीचे इंजेक्शन दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अनिकेत गोखले (वय २५, रा. मनोरुग्णालय, येरवडा आणि अनोळखी सिस्टर व ४ गार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवड्यातील प्रादेशिक रुग्णालयात दि.३० मे २०२३ ते २६ जून २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यातील एका १६ वर्षाच्या मुलाला खेड पोलिसांनी येरवडा बालनिरीक्षणगृहात ठेवले होते.तेथून त्याला मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अनिकेत गोखले याच्यावरही
उपचार करण्यात येत होते. त्याने या १६
वर्षाच्या मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार
केला. उपचारानंतर या मुलाला सोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला शाळेत
अॅडमिशन घेण्यासाठी कोल्हापूरला नेले. तेथे
तो आपला डावा हात दुखत असल्याची सारखा
तक्रार करु लागला. त्यामुळे डॉक्टरांना
दाखविण्यात आले. डॉक्टरांनी हाताचा एक्स रे
काढला असता त्याच्या हाताला तब्बल १८
ठिकाणी सुयांसारखे काही तरी टोचल्याने
दिसून आले. प्रादेशिक मनोरुग्णालयातील सिस्टर व ४ गार्ड यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन
दिल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याने
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस
उपनिरीक्षक गाताडे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment