बारामती येथील अंगणवाडी मेळाव्याला ५५० पालकांची उत्स्फुर्तपणे उपस्थिती... बारामती:-सुजाण नागरिक घडण्यासाठी दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण मिळणे महत्वाचे; संध्या नगरकर, महिला व बालविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पुणे शहरी प्रकल्प; “सुजाण नागरिक घडण्यासाठी दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण मिळणे, मुलांची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी ह्यासाठी अंगणवाडीमध्ये विविध अनुभव व कृतीच्या देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत,”,असे मत संध्या नगरकर महिला व बालविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, पुणे शहरी प्रकल्प -२ यांनी पालक मेळाव्यात व्यक्त केले. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याला ३ वर्ष पूर्ण झाल्यास त्याचे नाव अंगणवाडी मध्ये नोंदवावे असेही आवाहन त्यांनी केले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना, महिला व बालविकास विभाग, शहरी प्रकल्प व अनुबोध-योजक संस्था, पुणे यांच्या माध्यमातून बारामती व इंदापूर येथील निवडक अंगणवाड्यांमध्ये पूर्वप्राथमिक गुणवत्ता विकसन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आकारवर आधारित अभ्यासक्रमाची पालकांना ओळख व्हावी या करिता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीमधील पतंग शहानगर, सिद्धेश्वर गल्ली, खाटिकगल्ली, आमराई, कोअर हाउस, इंदापूररोड याठिकाणी पालक मेळावे घेण्यात आले. असेच मेळावे इंदापूर येथील निवडक अंगणवाड्यांमध्ये ही घेण्यात आले .बारामती येथील मेळाव्याला ५५० पालकांनी उत्स्फुर्तपणे उपस्थिती दर्शवली.त्यांनी अंगणवाडीमध्ये घेण्यात येणारी वाचन-लेखन पूर्वतयारी, गणित पूर्वतयारी, बोधात्मक व सृजनशील कृती यांसारख्या कृतीची माहिती घेतली,.तसेच पहिला जाण्याची तयारी कशी होते हे जाणून घेतले.
No comments:
Post a Comment