बापरे..पाच जणांनी नवऱ्याला डांबून ठेवत
सातारा :-महिलेवर अत्याचार होत असल्याच्या घटना घडत असताना नुकताच नवऱ्याला डांबून ठेवून 28 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आठरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील फलटण तालुक्यात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित महिला कातकरी समाजाची आहे. तिचे कुटुंब फलटण तालुक्यातील एका कोळसा उत्पादित कारखान्यात काम करते. तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, आठरा दिवसांपूर्वी कोळसा कारखान्याचा मालक बाळू शेख सहित पाच जणांनी तिच्या नवऱ्याला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले आणि सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर महिला रायगडमध्ये मामाकडे गेली आणि तिने त्यांना घटनेबद्दल माहिती दिली. मामाने लगेच पोलिसात धाव घेतली.कोकण परिक्षेत्राच्या पोलिस
महानिरीक्षकांकडून ही माहिती साताऱ्याच्या
पोलीस अधीक्षकांना देण्यात आली. शुक्रवारी पहाटे सातारा पोलिसांनी महिलेची तक्रार घेऊन
शेखला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या
साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment