पुणे ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. कारवाईचा धडाका.! पुणे :-पुणे ग्रामीण पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अनेक घटना, प्रसंग, बंदोबस्त त्याचबरोबर बदनामी याला देखील सामोरे जात आपल्या कर्तव्ये निभावत आपल्या पोलीस वर्दीची शान राखण्यासाठी प्रयत्न करीत असतात रोज नवे प्रसंगाला सामोरे जात असतात त्यामुळे पोलीस खात्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केलेच पाहिजे परंतु काही अंशी एक दोघामुळे काही लुडबुड करणाऱ्या लोकांमुळे पोलीस खात्याची बदनामी होत आहे हे अनेक घडलेल्या प्रकरणातून दिसून येत आहे बाकी इतर कामामध्ये तोडच नाही स्वतः च्या जीवाची, कुंटुंबाची, आरोग्याची कसलीही पर्वा न करता प्रामाणिक काम करण्याचे उद्दिष्टे हे मोलाचे आहे, रोज नवीन जबाबदारी पडत आहे गुन्हेगारी संपविण्याची होत असलेले प्रयत्न,अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान निष्ठतेने पार पाडण्याचा प्रयत्न असतो, नुकताच मद्यपान करुन वाहन
चालवणाऱ्या विरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी मद्यपींवर दंडात्मक कारवाई केली आहे. मद्य प्राशन करुन तर्र झालेल्या 340 जणांची ग्रामीण पोलिसांनी झिंग उतरवली आहे. मद्यपींवर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी पर्यटन स्थळी,
गर्दीचे ठिकाणी मद्य प्राशन करुन गोंधळ
घालणाऱ्या व्यक्तींवर तसेच मद्य प्राशन करुन
वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे
आदेश दिले होते.त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांकडून जिह्यात 14 ते 17 जुलै दरम्यान मद्यपी चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये 340 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत पुणे
ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी सहभाग नोंदवला होता.पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन
केले आहे की, पर्यटनस्थळी,गर्दीच्या ठिकाणी गोंधळ घालू नका. तसेच मद्यपान करून वाहन चालवू नका.मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक करावाई करण्यास सुरुवात झाली आहे.नागरिकांनी मद्यापान करुन वाहन चालवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment