कर्जवसुलीबाबत कर्जदारांना परतफेडीसाठी छळणं, इतर मार्गाने त्रास देणं आत्ता चालणार नाही,अर्थमंत्र्यांचे बँकांना निर्देश...
नवी दिल्ली :- कोरोना काळात लोकांचे झालेले हाल व त्यामुळे थकीत बँकेचे कर्ज व त्यासाठी होत असलेली हुकूमशाही त्यातून अनेकांचे गेलेले बळी यामुळे कर्जदार वैतागला होता कुठेही दयामाया न करता केलेली बँकेनी हरिशमेंट लोकांच्या जीवाला लागत होती आत्ता यातून दिलासा मिळणार असल्याचे नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी बँकेला निर्देश दिल्याची माहिती समोर आलंय, कर्जवसुलीसाठी बँकांकडून अनेकदा ग्राहकांना धमकावणे वा इतर मार्गाने त्रास दिला जातो. लहान कर्जदारांना हा त्रास जास्त सहन करावा लागतो. मात्र, आता तसे चालणार नाही. लहान कर्जदारांना परतफेडीसाठी छळू नका, असे निर्देश सर्व सरकारी व खासगी बँकांना दिल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी लोकसभेत दिली.या समस्येबाबत हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी प्रश्न विचारला. उत्तरात सीतारामन म्हणाल्या की,सर्वच बँकांनी अशी प्रकरणे संवेदनशीलता राखून माणुसकीच्या भावनेतून सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
कठोर मार्गांचा अवलंब करू नये. कर्जवसुलीबाबत नियम वसुली एजंटने ग्राहकाला सकाळी ८ ते सायं ७ या वेळेतच कॉल करावा.
ग्राहकाच्या ठिकाणीच भेटू शकतो.एजंटने ओळखपत्र दाखवावे.ग्राहकांची गोपनीयता पाळावी.ग्राहकाचा शारीरिक वा मानसिक छळ करता येत नाही.असे घडल्यास, ग्राहक थेट आरबीआयकडे तक्रार करू शकतो.
No comments:
Post a Comment