धक्कादायक..पोलीस अधिकाऱ्यांने पत्नी अन् पुतण्यावर पिस्तूलातून झाडल्या गोळ्या व स्वतःही केली आत्महत्या..
पुणे:- पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या कृत्याने
खळबळ उडाली असून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (३५) यांची हत्या झाली आहे.अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी सुट्टीवर आले होते. मध्यरात्री सव्वा तिनच्या सुमारास त्यांनी गोळी झाडून हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खासगी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या आहेत.
दरम्यान त्यांनी हत्या आणि आत्महत्या का केली हे मात्र समजले नसून,पुण्यातील बाणेर भागात ते राहत होते.त्यांचे कुटुंब येथे रहात होते. ते अमरावती येथे नेमणुकाला होते. तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या पुण्यात रहात होते.पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment