खळबळजनक..जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकाची कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या.
जेजुरी:- पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचे रोज घडणाऱ्या घटनेवरून दिसत आहे, यात भर की काय पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पानसेरे हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळचे होते.जेजुरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूब
पानसरे यांची जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली.घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हत्या
करण्यात आली. मेहबूब पानसरे हे सुप्रिया सुळे यांचे समर्थक होते. पानसरे यांनी जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. मात्र, जमिनीसंदर्भात वाद सुरू होते. त्यातच शुक्रवारी ते धालेवाडीत गेले असता, पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला
या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी,स्वामी वनेश परदेशी यांच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबुब पानसरे हे जेजुरीचे माजी नगरसेवक तसेच मोठे व्यापारी देखील होते. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेजुरीतील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जेजुरी
पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment