बारामतीत दशक्रिया विधी घाटावर बसण्याचा ठिकाणावर घाणीचे साम्राज्य;संबंधित विभागाचे दुर्लक्ष.! बारामती:- बारामती विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाटेल तेवढा निधी आणून कामे करीत असताना व त्यातील एक भाग म्हणून कऱ्हा नदीपात्रातील शुभोशिकरण करीत असताना त्यालगत असणाऱ्या जुन्या कचेरी समोरील दशक्रिया विधी घाटाचे देखील काही प्रमाणात काम चालू आहे ह्या कामातील मेन प्रवेशद्वारचा काही भाग कोसळला होता तेव्हा देखील ही बाब लक्षात आणून दिली होती तसेच याकामाकडे कोण अधिकारी लक्ष देतात की नाही हे कळणे लांबच असल्याचे सद्य परिस्थिती वरून दिसत आहे कारण याठिकाणी वारंवार दशक्रिया विधी होत असताना या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात महिला व पुरुष मंडळी येत असतात मात्र याठिकाणी बसण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यावर गुटखा व पान खाऊन थुंकलेले दिसते ते पूर्ण पायऱ्यावर थुंकलेले असल्याने बसण्याची अडचण व किळसवाणा प्रकार यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या असून तात्काळ याठिकाणी स्वच्छता व्हावी व घाण करणाऱ्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे, एकीकडे स्वच्छ तेचा नारा चालू असताना अश्या ठिकाणी जिथे दशक्रिया विधीसाठी लोक येत असताना त्यांना बसण्याची जागेवर रंगलेले (थुंकलेले)चित्र पाहून संताप व्यक्त केल्याशिवाय राहत नाही.विशेषतः हा थुंकणेचा प्रकार दुपारच्या वेळेस व रात्रीच्या वेळेस याठिकाणी काही टवाळखोर येऊन हा उपद्रव करीत असल्याचे समजते. तरी यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
Post Top Ad
Wednesday, July 19, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत दशक्रिया विधी घाटावर बसण्याचा ठिकाणावर घाणीचे साम्राज्य;संबंधित विभागाचे दुर्लक्ष.!
बारामतीत दशक्रिया विधी घाटावर बसण्याचा ठिकाणावर घाणीचे साम्राज्य;संबंधित विभागाचे दुर्लक्ष.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment