*बारामतीमध्ये युवकांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश....*
बारामती:- दि.७ रोजी बारामती मधील तरुणांनी मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश केला. सध्या महाराष्ट्रातील राजकारण आतिशय खालच्या पातळीवर गेले आहे. प्रस्थापित पक्ष सत्तेसाठी हपापले आहेत. कोणतीही विचारधारा, तत्व न पाळता युत्या व आघाड्या होत आहेत. यामुळे सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ आहे. अशा कार्यकर्तांनी आज संभाजी ब्रिगेड मध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हा सचिव विनोद जगताप यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी बैठक संपन्न झाली. या बैठकी नंतर बारामती तालुका व शहर कार्यकारिणीच्या निवडी आणि नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तालुका अध्यक्ष पदी तुषार तुपे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणीत हरिश्चंद्र वाबळे (उपाध्यक्ष), ऋषिकेश निकम (सचिव), मनोज काळोखे (कार्याध्यक्ष), विशाल भगत (सरचिटणीस), अक्षय घाडगे (संघटक), सागर गाडे (संघटक) यांचा समावेश आहे.
तालुका कार्यकारिणीत अस्लम रज्जाक तांबोळी (शहराध्यक्ष), सुदर्शन निचळ (सचिव), असलम तांबोळी (कार्याध्यक्ष) यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment