बारामतीच्या एस टी स्टँड वर चिखलाचे व डबक्याचे साम्राज्य !प्रवाशांना व लोकांना होणाऱ्या त्रासाकडे एस टी प्रशासनाचे दुर्लक्ष !संभाजी ब्रिगेड चा आंदोलनाचा ईशारा...
बारामती:- उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी या समस्येचे तातडीने निराकरण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे,दि. २७/०७/२३, बारामती एसटीचे बसस्थानक परिसरात मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य असून, त्याकडे एसटी महामंडळातील अधिकारी कानाडोळा करत आहेत.
अचानक एखादी बस आल्यास प्रवाशांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवाशांना दररोज तोंड द्यावे लागणाऱ्या समस्येकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळच नाही. 'वाट पाहीन पण एसटीनेच जाईन', असे म्हणण्याएवजी बारामती बसस्थानकातून (Bus Stand) ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर मात्र 'वाट पाहीन पण ' चिखला'तूनच जाईन' असे म्हणण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे.
मागील वर्षी पासुन बारामती बस डेपो चे काम जोरात चालु आहे. एस टी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कसबा येथे पर्यायी बस स्थानक उभारले आहे त्या मधे पावसामुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे प्रवाशांना या चिखलातून मार्ग काढताना तारेवरची कसरत कारवी लागत आहे, याचा त्रास प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र एसटी महामंडळाला जराही प्रवाशांबाबत सामाजिक बांधिलकी उरली नाही, असा आरोप करत त्वरित खड्डे बुजवा अन्यथा प्रवाशांची व नागरिकांची या त्रासातून सुटका होण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा एसटी महामंडळाला संभाजी ब्रिगेड, बारामती तर्फे देण्यात आला असल्याचे लेखी निवेदनात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment