बारामती मध्ये पहिल्यांदाच उद्योजक मित्रांचा मेळावा संपन्न..योध्दा प्रोडक्शनच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीकांत आव्हाड यांनी केले 200 व्यवसायिकांना मार्गदर्शन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

बारामती मध्ये पहिल्यांदाच उद्योजक मित्रांचा मेळावा संपन्न..योध्दा प्रोडक्शनच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीकांत आव्हाड यांनी केले 200 व्यवसायिकांना मार्गदर्शन...


बारामती मध्ये पहिल्यांदाच उद्योजक मित्रांचा मेळावा संपन्न..योध्दा प्रोडक्शनच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीकांत आव्हाड यांनी केले 200 व्यवसायिकांना मार्गदर्शन...

बारामती: -  बारामती मधील योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त दौंड, इंदापूर, बारामती, फलटण व परिसरातील व्यावसायिक /उद्योजक मित्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीकांत आव्हाड उद्योजक मित्र अहमदनगर, तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री गणेश इंगळे हे होते. बारामती आणि परिसरातील सर्व व्यावसायिकांना नवीन व्यवसाय करताना च्या अडचणी, व्यवसाय मार्गदर्शन आणि सर्व व्यावसायिक बंधूंची वैचारिक देवाण-घेवानाची भेट व्हावी या उद्देशाने उद्योजक मित्रांचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 200 हुन अधिक व्यवसायिक बांधवांनी सहभाग घेतला होता. महिलां
व्यावसायिकांची देखील उपस्थिती लक्षणीय होती. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
     या कार्यक्रमामध्ये बारामती आणि परिसरातील पाच उद्योजकांचा योद्धा उद्योजक या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे आनंद सावंत, राजू कोंढाळकर, शरद नामदे, स्वप्निल कोंढाळकर व संदीप देशमुख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीकांत आव्हाड सर यांनी उद्योग जगतातील विविध अनुभवाचे मोलाचे मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब साळवे यांनी केले तर आभार योगेश नालंदे यांनी मानले. हा कार्यक्रम हॉटेल पंजाब रसोई भिगवन रोड बारामती येथे आयोजित करण्यात आला होता. सोनाली देशमुख, रोहन आहुजा, अमित देशपांडे, भारत दळवी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment