*खेलो इंडिया पिंच्याक सिलाट लीग 2023 मध्ये अनुष्का गवळीचा डंका* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

*खेलो इंडिया पिंच्याक सिलाट लीग 2023 मध्ये अनुष्का गवळीचा डंका*

*खेलो इंडिया पिंच्याक सिलाट लीग 2023 मध्ये अनुष्का गवळीचा डंका*
मुंबई:- खेलो इंडिया लीग 26 व 27 ऑगस्ट ला नवी मुंबई या ठिकाणी पार पढली या स्पर्धेत अनुष्का सचिन गवळी हिने तुंगल व गंडा या दोन्ही इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल मिळवून आपल्या आई वडिलांचे नाव मोठे केले, तिला योद्धा स्पोर्टस् अकॅडमी बारामतीचे मार्गदर्शन लाभले, अनुष्काचे वडील सचिन गवळी हे डायनामिक्स या कंपनी मध्ये काम करून आपल्या मुलीला पिंच्याक सिलाट खेळ शिकवण्यासाठी योद्धा स्पोर्टस् क्लब ला पाठवतात, अभ्यासा सोबत आपले आरोग्य राखावे या उद्देशाने तिने आपला खेळ सुधारत बारामतीला खेलो इंडिया स्पर्धेत दोन गोल्ड मेडल मिळवून देऊन बारामतीचे व आपल्या स्कुल चे नाव राज्यभर गजवले. अनुष्का ही M.E.S high स्कुल ला शिक्षणरी मुलगी आहे तिच्या ह्या यशाचे कौरतूक त्यांच्या स्कुल च्या सर्व शिक्षकांनी केले. अशी माहिती साहेबराव ओहोळ यांनी दिली. 

 स्पोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने खेलो इंडिया वुमन्स पिंच्याक सिलॅट लीग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल कोपरखैरणे, नवी मुंबई येथे २६ व २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. 
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नवी मुंबईचे नगरसेवक
ममितजी चौघुले, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, फादर जैसन मुंबई झोन मॅनेजिंग डायरेक्टर क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल, शीतल कचरे, डॉ. प्रतीक माने, सुधीर वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धा सर्व वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील ५३५  खेळाडू सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, फादर जिटो प्रिन्सिपल क्राईस्ट ॲकॅडमी स्कूल, संदीप पाटील, अध्यक्ष, मुंबई झोन पिंच्याक सिलॅट असोसिएशन, सुरेखा येवले, अध्यक्षा, नवी मुंबई पिंच्याक सिलॅट, असोसिएशन, वीरेंद्र शिव, M.D., मलविन इंटरप्राइज, अनुज सरनाईक, साहेबराव ओहोळ, अरविंद शिर्के, संकेत धामंडे, तृप्ती बनसोडे सदस्य- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 
'तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक' १० सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्य पदकांसह पुणे ग्रामीण संघाने पटकावला. 
दरम्यान, किशोर येवले यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांचा सत्कार करून पिंच्याक सिलॅट खेळाचा समावेश गोवा येथे होणाऱ्या  ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाल्याची महिती दिली. या राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडू  महाराष्ट्राला जास्तीतजास्त पदके मिळवून देतील, असे शिरगावकर यांना सांगितले. पिंच्याक सिलॅट खेळाला देशातील १५ राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे; पण, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे महाराष्ट्र संघ मागील ११ वर्षे अव्वल स्थानी असूनसुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना शासनाच्या नोकर भरतीचा आणि योजनांचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देऊन खेळाडूंना योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती नामदेव शिरगावकर यांच्याकडे केली.
 त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट या खेळाला खेलो इंडिया वुमन्स लीगमध्ये सामील करून पिंच्याक सिलॅटच्या महिला खेळाडूंना खेळण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोड ह्यांचे आभार मानले. 
नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पिंच्याक सिलॅट खेळाविषयी बोलताना या खेळाचा गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश झाल्याबद्दल किशोर येवले सरांचे व त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना सरावासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची मदत ही महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि महाराष्ट्र शासनाद्वारे केली जाईल, असे सांगितले. किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे शिरगावकरांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे पिंच्याक सिलॅट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देण्याचे आश्वासित करून महाराष्ट्रातील खेळाडूंना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या होणाऱ्या मिटिंगमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा शब्द सर्व खेळाडूंना दिला.
पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून, (१) टॕंडींग (फाईट) (२) तुंगल (सिंगल काता) (३) रेगु (ग्रुप काता), (४) गांडा (डेमी फाईट) (५) सोलो (इव्हेंट) या पाच प्रकारांत खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये समावेश  केला आहे. या खेळाला 'युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार', 'भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलिस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक  काउंसिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बीच गेम, भारतीय  विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. 

या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे.

No comments:

Post a Comment