खळबळजनक..वाढीव कलम व पोलीस कस्टडीत न मारण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी, सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस
नाशिक:- पोलीस प्रामाणिक काम करीत असताना काही ठराविक लाचखोर पोलिसामुळे पोलीस खाते बदनाम होत आहे याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या नुकताच पोलीस
ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस
कस्टीत मारहाण करणार नाही तसेच 307 कलम वाढवण्याची भीती दाखवून 50 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या येवला शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीच्या पथकाने दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस शिपाई सतीश बागुल असे गुन्हा दाखल करण्यात
आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत येवला
येथील 24 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे.कुणाल सपकाळे आणि सतीश बागुल हे येवला शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यातील तक्रारदार यांच्या भावाच्या नावावर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात भावाला पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करणार नाही तसेच या गुन्ह्यात 307 वाढीव कलम लावण्याची भीती घालून सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलीस शिपाई सतीश बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.तसेच एपीआय कुणाल सपकाळे यांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन त्यांचा
जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेतला.
सपकाळे यांनी तक्रारदार यांच्या मोबाईलमधील
मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली.याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार
केली.पथकाने पडतळणी करुन एपीआय सपकाळे व पोलीस शिपाई बागुल यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 7 (a) तसेच आयपीसी 166, 201, 452 प्रमाणे गुन्हा
दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे -वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक विश्वजीत जाधव,पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे,नितिन कराड, परसराम जाधव यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment