बारामती येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नवीन पदाधिकारी नियुक्ती... बारामती:- दिनांक 20.8.2023 रोजी बारामती येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली जवळजवळ वीस ते पंचवीस जनाची या मीटिंगमध्ये नियुक्ती करण्यात आली व या मीटिंगमध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे व श्री मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख श्री राम राऊत या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्ष मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत केली त्याचा आढावा घेण्यात आला तसेच दिनांक 2/9/2023 रोजी गाव कन्हेरी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे त्या संदर्भात सविस्तर चर्चा करून सर्वांना याविषयी कल्पना दिली या मीटिंगमध्ये महिला आघाडीच्या सर्व महिला व बारामतीतील तालुका समन्वयक श्री मंगेश खताळ व बारामती तालुका समन्वयक श्री श्रीकृष्ण मूर्ती जगताप मेडिकल सेलचे श्री संतोष जी गोलांडे, नागेश जाधव पुणे महाराष्ट्र राज्याचे शिवक्रांती अध्यक्ष श्री बापूराव जी सोलणकर यांनी या कार्यक्रमासाठी बारामतीतील सुसज्ज असा मल्हार क्लब मीटिंग साठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप धन्यवाद विशेष म्हणजे त्यांचे या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्यावरती अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल खूप आनंद झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे युवा सेना अध्यक्ष व सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणारे आमचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री अनिल रावजी जगताप यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली या कार्यक्रमाला पुणे शहर प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे श्री अजय जी सपकाळ, पुणे शहर उपप्रमुख श्री जय होले यांचेही उपस्थित नवीन पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल द्वारे मार्गदर्शन मिळाले विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे,श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री कार्यालय श्री मंगेशजी चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख श्री राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यासाठी 40 ते 45 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून रुग्णांना मिळाला त्याबद्दल वरील मान्यवरांचे रुग्णांची नातेवाईकांनी मन भरून कौतुक केले सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती सतीश गावडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे उपजिल्हा समन्वय यांनी दिली.
Post Top Ad
Sunday, August 20, 2023
बारामती येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नवीन पदाधिकारी नियुक्ती...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment