*चर्च ऑफ ख्राईस्ट येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

*चर्च ऑफ ख्राईस्ट येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन*

*चर्च ऑफ ख्राईस्ट येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन*
बारामती, दि.२१: उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयाच्यावतीने शहरातील चर्च ऑफ ख्राईस्ट येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, धर्मगुरु पास्टर अब्राहाम रत्नाकर श्रीवास्तव, अध्यक्ष सुशीलकुमार मोहन जाधव, उपाध्यक्ष दीपक धोंडीराम जाधव, सचिव राजेश शांतवन जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी मतदारांना नमुना क्र. ६, ७ आणि ८ चे फॉर्म वाटप करण्यात आले. नवीन मतदारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. व्होटर हेल्पलाईन ॲप विषयी माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment