बारामती:-आज रोजी बारामती शहरामध्ये नागपंचमी सणाच्या आनुषंगाने बारामती शहर
पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, अविनाश मिलींद सोनवणे रा. भोईटे हॉस्पिटलसमोर इंदापूर रोड बारामती ता. बारामती जि. पुणे याने आपलेकडे काही तलवारी बेकायदेशिरपणे जवळ बाळगल्या आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे
यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके,पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, अक्षय सिताप, दशरथ इंगोले, मनोज पवार, सागर जामदार, दादासाहेब जाधव यांना मिळालेली माहिती सांगून सदर इसमास ताब्यात घेवून खात्री करणेबाबत कळविले असता सदर पथकाने तात्काळ सदर इसमाची माहिती काढून त्यास ताब्यात घेतले असता अविनाश मिलींद सोनवणे याने त्याचेकडे तलवारी असल्याचे कबुल करुन त्याने काही दिवसांपुर्वीच त्या बारामती नगरपरिषदेच्या पाठीमागे तीन हत्ती चौकाजवळ निरा डावा कालव्यामध्ये राकल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे सदर इसमास त्याठिकाणी नेवून पाहणी केली असता सध्या कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह चालू असल्याने बारामती
नगरपरिषदेच्या कामगारांच्या मदतीने कालव्यामधून तीन खालील वर्णनाच्या तलवारी मिळून आल्या आहेत.१) १००० = ०० एक १९ इंच लांबीची पितळी पाते असलेली त्याचे एका बाजूस बोथट धार असलेली मध्यभागी २.५ सेमी रुंदीची पुढील बाजूस निमुळती टोकदार होत गेलेली त्यास ४ इंच लांबीची पितळी वक्राकार डिझाईन असलेली मुठ असलेली. एकूण २३ इंच लांबीची पितळी तलवार जु.वा.
२) १००० = ०० एक १९ इंच लांबीची पितळी पाते असलेली त्याचे एका बाजूस बोथट धार असलेली मध्यभागी २.५ सेमी रुंदीची पुढील बाजूस निमुळती टोकदार होत गेलेली त्यास ४ इंच लांबीची पितळी वक्राकार डिझाईन असलेली मुठ असलेली. एकूण २३ इंच लांबीची
पितळी तलवार जु.वा.३) ५०० = ०० एक १९ इंच लांबीची लोखंडी पाते असलेली त्याचे एका बाजूस बोथट धार असलेली मध्यभागी ४ सेमी रुंदीची पुढील बाजूस निमुळती टोकदार होत गेलेली त्यास ७ इंच लांबीची गोलाकार असलेली मुठ वेल्डींग केलेली एकूण २६ इंच लांबीची लोखंडी तलवार जु.वा.मिळून आलेला अविनाश मिलींद सोनवणे वय २५ वर्षे रा. भोईटे हॉस्पिटलसमोर इंदापूर रोड बारामती ता. बारामती जि. पुणे याचेविरुद्ध गुन्हा दाखल करुन बारामती शहर पोलीस स्टेशन येथून अधिक तपास करीत आहे.अशा प्रकारे बेकायदा तलवारी अगर घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवणा-या लोकांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पोलीसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment