बारामती:-नुकताच काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठित महाविद्यालयात एका मुलीने इमारतींवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या घटनेची कोठेही वाच्यता करण्यात आले नव्हते अशी दबक्या आवाजात अजूनही चर्चा चालू असतानाच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनीची आत्महत्या विचार करायला व पालक वर्गात आत्मचिंतन करायला लावणारी घटना घडलीय याबाबत समजलेल्या माहिती नुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत निवासस्थान असलेल्या भिगवण रोड नजीक सहयोग सोसायटीतील एका 12 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.कु.*** **** ( वय 12 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती बारामतीतील नामांकित विद्या प्रतिष्ठान
सायरस पुनावाला शाळे मध्ये प्राथमिक शिक्षण घेत होती.दरम्यान, या विद्यार्थिनीचे कुटुंबीय हे मूळचे करमाळ्याचे प्रतिष्ठित असून ते मुलीच्या उत्तम शिक्षणासाठी करमाळ्याहून बारामतीत
स्थायिक झाले असल्याचे कळतंय.त्यामुळे आता मुलीच्या आत्महत्येनंतर सोसायटीत शोककळा पसरली असून शिक्षणाने मुलीचा बळी घेतला का?की दुसरं काय कारण असू शकतं अशीच चर्चा स्थानिक रहिवाश्यांमध्ये चालू असल्याचे कळतंय. तर अधिक माहिती लवकरच कळेल.
No comments:
Post a Comment