बस स्थानक व सराफाच्या दुकानातील दागिने चोरणाऱ्या महिलांसह तिघास अटक..
इंदापूर:- बस स्थानक येथून प्रवासी महिलेची पर्स मधील दागिणे चोरी करणा-या दोन आरोपी महिलांसह तिघास अटक, चोरीस गेलेल्या ११ तोळे सोन्याचे दागिण्यासह व चोरीचे ८ मोबाईल तसेच इंदापूर मधील सराफा दुकानात चोरी करणा-या आरोपीस अटक करून चोरी केलेले सोन्याचे टॉप्स असे एकूण ७ लाख रूपयाचां मुददेमाल हस्तगत करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की,दिनाक १९.०८.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास प्रवासी महिला या पती व वडिल यांच्यासह इंदापूर बस स्थानक येथून लातूर येथे माहेरी निघाल्या होत्या. त्याबस मध्ये चढताना गर्दीमध्ये त्यांच्या पर्समधील सोन्याच्या बांगडया, नेकलेस, अंगठया, कानातील टॉप्स, ठूसी असे ११ तोळे सोन्याचे
दागिणे चोरीस गेले होते. सदरबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क. ८६७ / २३ भादवि कलम ३७९ दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पो.नि. दिलीप पवार सो यांनी गुन्हे शोध पथकास गुन्हा
उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तसेच गोपनीय माहिती वरून सदरची चोरी ही महिला आरोपी नामे. १. काजल प्रविण भोसले वय १९ वर्षे, २. अर्पणा सचिन भोसले वय २४ वर्षे, ३. सचिन आंनता भोसले वय २६ वर्षे रा. देवूळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे यांनी केल्याच निष्पन्न झाले. सदर आरोपीत चोरी केल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. सलग तीन दिवस वेषांतर त्यांना ताब्यात घेवून त्यांना गुन्हयात करून त्याचे गावाच्या आजूबाजूस तळ ठोकून ते घरी परत अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून चोरी केलेले ११ तोळे सोन्याचे दागिणे, वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले ८ मोबाईल तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली स्पेंलंडर मो. सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.सदर आरोपी यांनी यापुर्वी, बारामती, दौंड, पुणे स्टेशन, स्वारगेट, अहमदनगर येथेही चो-या केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे हे करित आहेत.तसेच दिनांक ७/८/२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजताच्या सुमारास इंदापूर शहारातील साईराम ज्वेलर्स या दुकानात ग्राहकाची गर्दी असताना एका अनोळखी इसमाने कानातील टॉप्स बघण्याचा बहाणा करून सदरचे सोन्याचे टॉप्स चोरी केलेले होते. सदर बाबत इंदापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद
करण्यात आला होता. सदरचे टॉप्स चोरी करणारा आरोपी नामे शरद सुभाष गुंजाळ वय २६ वर्षे रा.बारनोली, ता.माढा जि. सोलापूर यास तांत्रिक माहिती वरून अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे टॉप्स हस्तगत करण्यात आलेले आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक
श्री. आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक सुधिर पाडूळे, सफौ प्रकाश माने, नितीन तांबे,पो.हवालदार ज्ञानेश्वर जाधव, राकेश फाळे, सचिन बोराडे, शुभांगी जाधव, दिलशाद मुजावर पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गणेश डेरे, गजानन वानोळे, अकबर शेख, होमगार्ड संग्राम माने, लखन
झगडे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment