वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड करून आरोपी जेरबंद..
वडगाव निंबाळकर:- पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 359/2022 IPC 392 यातील फिर्यादी महिला या ढगाईमाता मंदिरात दर्शन घेत असताना पाठीमागून ढकला ढकली करून गर्दीचा फायदा घेऊन यातील आरोपी मजकुर याने फिर्यदीचे गळ्यातील सोन्याचे मिनी घंटन तोडुन काढून चोरून घेऊन गेला होता.सदर आरोपी बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल होता. गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून इसम नामे योगेश बालाजी कांबळे वय 19 वर्ष रा.नूर कॉलनी शिवनी रोड गांधीनगर बीड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे सांगितलेने. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून सदर आरोपी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक श्री. अंकित गोयल अप्पर पोलिस अधिक्षक सो आनंद भोईटे,एस.डी.पी.ओ बारामती श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर PSI सिदपाटील, ASI कोकरे,ASI कारंडे,पो हवा असिफ शेख,पो हवा स्वप्निल अहिवले,पो.हवा अभिजीत एकशिंगे,पो हवा राजू मोमीन,पोलीस हवालदार अतुल डेरे,चालक सहा फौज राजापुरे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment