पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 14, 2023

पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन..

पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन
बारामती, दि. 14: तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमन आणि ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी तहसील कार्यालय येथे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

तहसील कार्यालय व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणासत्रामध्ये ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून सहज व सुलभ सेवा देणे. ग्रामीण भागातील नागरिकांना पीएम किसान योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून देणे, बँकेत संबंधित खातेदारांचे खाते उघडणे, नागरिकांसाठी असलेल्या अपघाती विमा योजना, जीवन विमाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.  

यावेळी इंडिया पोस्टचे सहायक महाव्यवस्थापक प्रशांत शिंदे, विभागीय प्रमुख रोहित बर्नवाल, शाखा व्यव्यस्थापक समीर कोरडे, कार्यकारी अधिकारी मनोज ढेंबरे, किशोर ननावरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment