डी पी जगताप कंपनी बारामती च्या बेन्ज कंपनीचा हायवा ट्रक ड्रायव्हर वर मंनुष्य वधाचा गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 29, 2023

डी पी जगताप कंपनी बारामती च्या बेन्ज कंपनीचा हायवा ट्रक ड्रायव्हर वर मंनुष्य वधाचा गुन्हा दाखल...

डी पी जगताप कंपनी बारामती च्या  बेन्ज कंपनीचा हायवा ट्रक ड्रायव्हर वर मंनुष्य वधाचा गुन्हा दाखल...                                              बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये नुकताच गु.र.नं 627/2023 भादविक 304 (2),279, मोटार वाहन कायदा कलम 1988 चे कलम 134,184 अंतर्गत गुन्हा दाखल असून श्री अनिल रामदास पवार वय 34वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा आसु सिध्दार्थनगर ता फलटण जि सातारा यांनी केलेल्या फिर्यादीवरून डी पी जगताप अॅन्ड कंपनी बारामती च्या भारत बेन्ज कंपनीचा हायवा ट्रक नं MH42AQ8255 वरील अज्ञात ड्रायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दिनांक.29/08/2023रोजी सकाळी 09/00 वाजताचे मौजे सोनगाव गावचे हददीत हाॅटेल नानासाहेब समोर रोडवर ता बारामती जि पुणे येथे माझा भाउ सतिष पवार व पुतण्या आर्यन पवार यांना बारामती बाजुकडुन सोनगावचे दिशेने भरधाव वेगात येणारा डी पी जगताप अॅन्ड कंपनी बारामती च्या भारत बेन्ज कंपनीचा हायवा ट्रक नं MH42AQ8255
5 वरील ड्रायव्हरने त्याचे ताब्यातील हायवा ट्रक हा अपघात झाल्यास समोरील वाहनावरील इसमांचा जीव जाईल याची जाणीव असताना देखील हयगईने अविचाराने भरधाव वेगाने व बेदरकारपणे जाणीवपुर्वक चालवुन त्याचे समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना विरुद्ध दिशेने येणारे भाउ सतीष पवार याचे मोटार सायकलला ट्रकचे ड्रायव्हर बाजुने समोरासमोर जोरात धडक देवुन अपघात करुन ड्रायव्हरने जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न पुरविता मोटारसायकल नं MH11CS7472 चे नुकसान करुन तसेच सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती न देता पळुन गेला असुन भाउ सतीष पवार व पुतण्या आर्यन पवार यांचे सदोष मनुष्यवधास कारणीभुत झालेला आहे म्हणुन माझी डी पी जगताप  कंपनी बारामती च्या  बेन्ज कंपनीचा हायवा ट्रक नं MH42AQ8255 वरील अज्ञात ड्रायव्हर विरूध्द तक्रार केल्याने  मपोहवा मोरे यांनी दाखल करून घेतली तर अधिक तपास अंमलदार पोसई लेंडवे करीत आहे.

No comments:

Post a Comment