बारामती :-अकॅडमीं व क्लासेस चे वाढते प्रमाण पाहता व शाळेचा शिक्षणाचा दर्जा खालविला असल्याचे दिसत आहे की काय म्हणून लाखो रुपये भरून पालक मुलाला खाजगी क्लासेस, अकॅडमींमध्ये शिकायला टाकत आहे, परंतु यातील किती बेकायदेशीर व किती कायदेशीर आहे हे तपासणे गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, नुकताच बारामती शहरात मागील काही वर्षात बेकायदेशीर अकॅडमींचे पेव वाढले असून शासनाची परवानगी नसताना या अकॅडमींकडून विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात
ढकलण्याचं काम सुरू आहे. याबाबत बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांच्या तक्रारीनंतर त्रिस्तरीय समितीने अकॅडमींची तपासणी सुरू केली आहे.त्यामुळे या अकॅडमींवर शिक्षण विभागाकडून कारवाई
होणार का याकडेच आता लक्ष लागले आहे.
बारामती शहरात मागील काही काळात बेकायदेशीर अकॅडमींचे पेव फुटले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं आमिष दाखवून वाटेल तशा फी आकारली जात आहे. या अकॅडमींना शिक्षण विभाग अथवा राज्य शासनाकडून
कोणतीही परवानगी मिळालेली नाही. असे असताना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली या अकॅडमींनी शिक्षणाचा काळाबाजार चालवला आहे. लाखो रुपये फी
वसूल करून या अकॅडमींकडून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली जात आहे.बारामतीत असलेल्या अकॅडमींचा सुरू असलेला उच्छाद
संपवण्याच्या उद्देशाने येथील कार्यकर्ते मोहसीन
पठाण यांनी शासनाच्या विविध विभागांकडे तक्रारी केल्या .मध्यंतरी या अकॅडमींच्या फायर ऑडिटबाबत बारामती नगरपरिषदेसमोर आंदोलनही केले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे या बेकायदेशीर
अकॅडमींवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.त्यामुळेच मोहसीन पठाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा पवित्रा घेतला होता.शासनाची कसलीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे या
अकॅडमी चालवल्या जातात हे अनेकदा निष्पन्न झाले आहे.विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत याबाबत तक्रारीही देण्यात आल्या. मात्र आजवर या अकॅडमींना अभयच मिळाले आहे. अशातच शिक्षण विभागाकडून त्रिस्तरीय समितीकडून या अकॅडमींची तपासणी सुरू करण्यात आली
आहे. या समितीकडून आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment