खळबळजनक...वाळू उपसा करित असलेल्या पोकलेनवर कारवाई न करण्याकरिता दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टीकरप्शन कडून कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 31, 2023

खळबळजनक...वाळू उपसा करित असलेल्या पोकलेनवर कारवाई न करण्याकरिता दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टीकरप्शन कडून कारवाई...

खळबळजनक...वाळू उपसा करित असलेल्या पोकलेनवर कारवाई न करण्याकरिता दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टी
करप्शनकडून कारवाई...       अहमदनगर:- अवैध वाळू उपसा अनेक ठिकाणी चालू असून यावर कारवाई न करिता तडजोड केली जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत अशीच  पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती दीड लाख रुपये लाच
मागणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा  दाखल केला आहे. आकाश नारायण काशीकेदार (वय- 28 ) असे गुन्हा दाखल केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि. 31 ) केली. याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील जकाते
वस्ती येथील रहिवासी असलेल्या 28
वर्षीय व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या
मित्राकडून तोंडी भाडेतत्त्वावर पोकलेन
मशिन कामा करीता घेतला होता. हा
पोकलेन 11 जुलै रोजी रात्री एक वाजता पेडगाव येथील तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीच्या शेतात लावला होता. त्यावेळी पेडगावचे
तलाठी काशीकेदार व सर्कल डहाळे हे
पोकलेन लावलेल्या ठिकाणी आले.तुम्ही हा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे यांना सांगितले. तसेच तुमच्या पोकलेन
वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली.
तलाठी आकाश काशीकेदार यांनी तक्रारदार यांना 17 जुलै रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार
पथकाने 11 जुलै रोजी पंचासमक्ष लाच घेतल्याची पडताळणी केली.  पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी आकाश काशीकेदार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती
दीड लाख रुपये लाचेची मागणी करून
ती लाच रक्कम टप्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली. याबाबत एसीबीच्या पथकाने गुरुवारी तलाठी आकाश काशीकेदार याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा  घारगे-वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे ,पोलीस निरीक्षक राजू आल्हाट  पोलीस अंमलदार शिंदे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,
हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment