लढवय्ये नेतृत्व : संजयजी भोकरे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 25, 2023

लढवय्ये नेतृत्व : संजयजी भोकरे

लढवय्ये नेतृत्व : संजयजी भोकरे
मुंबई:-ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत संघटनेत काम करणार्‍या पत्रकारांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक, दैनिक महानगरी व दैनिक जनप्रवास या दैनिकांचे संपादक तथा अंबाबाई तालिम संस्था मिरज, सांगली या संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त, आमचे मार्गदर्शक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला कार्याचा आढावा...
राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सभासद आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र या भागात संघटनेने सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने उभारुन हा संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, आज त्याला यश मिळाले आहे.
राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी पत्रकार भवन उभारले असून पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात, उच्च शिक्षणातही सवलती मिळाव्यात तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचा विस्तार विविध राज्यात करण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत. याबरोबरच राज्यातील पत्रकारांना देशाच्या राजधानीत थांबण्यासाठी पत्रकार भवन उभारले आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर याठिकाणी देखील पत्रकार संघाच्या सभासदांसाठी पत्रकार भवन उभारले आहे.
सभासदांना संघटनेमार्फत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम, टोलनाके, सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीव कोठा ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे, एस. टी., एअरलाईन, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्य दिले जाते त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय होतो. आरोग्य, विमा संरक्षण व मोफत प्रवास या तीन मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून ग्रामीण पत्रकारांना या सवलतींचा फायदा देण्याचा प्रयत्न संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
संघाचे सांगली, मिरज या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरु असून पुणे जिल्ह्यातही असे उपक्रम सुरु करण्याचा मानस आहे. ग्रामीण भागासह वर्तमान पत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व लढ्यासाठी संघाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. संघटना कोणतीही असो मात्र पत्रकारांना संरक्षण, त्यांच्या कार्याची दखल घेणारी संघटना भविष्यात पत्रकारांना तारु शकते, त्यासाठी संघटनेमार्फत विभागनिहाय अधिवेशने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार दिन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव व पाठीवर शाबासकीची थाप आम्ही नेहमीच देत आलो आहोत व देत आहोत. संघाने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली आहे यासाठी भोकरे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सभासद आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे काम सातत्याने होत आहे. अनेक पत्रकारांना हलाखीच्या परिस्थितीत पत्रकार संघाकडून आर्थिक मदत केली जात आहे. संघाचे सभासदांना अधीस्वीकृत कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. समाजातील विविध घटकांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पत्रकार संघाकडून गौरविण्यात येत आहे यासाठी मा.भोकरे साहेबांचे मार्गदर्शन मिळत आहे.
संघामार्फत उत्कृष्ट पत्रकारीता जीवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक, पत्रकारिता, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणार्‍या व्यक्तींना व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. तसेच  राज्यभरात पत्रकारांची मोट बांधण्यासाठी राज्य संघटक संजय भोकरे यांच्या कल्पक नेतृत्वातून संघटनेचा विस्तार राज्याच्या पलिकडे जाऊन ‘ऑल इंडिया जर्नालिस्ट’ची  स्थापना करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे भव्य दिव्य इमारतीत हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
कवि कुसुमाग्रज यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ या न्यायाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मा.भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्दीष्ट व ध्येय्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, करीत राहणार आहे.  साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

शब्दांकन : डॉ.विश्वासराव आरोटे
प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई

No comments:

Post a Comment