मावळ तालुक्यातील चावसर आणि मोरवे या गावात दोन स्वतंत्र नवीन शाखाडाकघरांचे उद्घाटन.. पुणे:-दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी, पुणे ग्रामीण डाक विभागा अंतर्गत मावळ तालुक्यातील चावसर आणि मोरवे या गावात दोन स्वतंत्र नवीन शाखाडाकघरांचे उद्घाटन श्री बाळकृष्ण एरंडे, अधीक्षक पुणे ग्रामीण डाक विभाग शिवाजीनगर, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. चावसर शाखाडाकघराच्या उद्घाटन प्रसंगी श्री नवनाथ कुदळे, सरपंच चावसर, श्री भाऊसाहेब काळवीट, माजी सरपंच, श्री संतोष राऊत उपसरपंच चावसर, श्री एस. डी. मोरे, सहायक अधीक्षक (मुख्यालय) पुणे ग्रामीण विभाग, श्री गणेश वडूरकर, सहायक अधीक्षक ग्रामीण पश्चिम उपविभाग आणि विभागीय कार्यालय, पुणे ग्रामीण विभागाचे कर्मचारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. तर मोरवे शाखाडाकघराच्या उद्घाटनप्रसंगी श्री अप्पासाहेब भानवसे, ग्रामसेवक, श्री लालासाहेब वांजळे पाटील, प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान श्री एरंडे यांनी विविध टपाल बचत योजना आणि ग्रामस्थांच्या
जीवनातील त्यांचे महत्त्व विशद केले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून, शाखा शाख डाकघरामार्फत आधार नोंदणी आणि अद्यतनासह सर्व DBT लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले जातील असेही त्यांनी सांगितले. भारत
सरकारच्या आर्थिक समावेशन योजनेंतर्गत पुणे ग्रामीण विभागामध्ये एकूण 11 नवीन शाखा डाकघर मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याशृंखले अंतर्गत आजपर्यंत एकूण तीन शाखाडाकघर सुरु करण्यात
आलेली आहेत, त्यापैकी चावसर आणि मोरवे शाखाडाकघराचे उद्घाटन आज पार पडले. उद्घाटन कार्यक्रमावेळी श्री नवनाथ कुदळे यांनी चावसर गावात नव्याने सुरू झालेल्या शाखा शाखा डाकघरामध्ये सर्व प्रकारची नवीन खाती
उघडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment