बारामतीत वाढलेली चोरांची दहशत होतेय कमी.! कारण चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लढविली शक्कल नामी.!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

बारामतीत वाढलेली चोरांची दहशत होतेय कमी.! कारण चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लढविली शक्कल नामी.!!

बारामतीत वाढलेली चोरांची दहशत होतेय कमी.! कारण चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लढविली शक्कल नामी.!!                                     बारामती:-गेल्या काही दिवसांपासून बारामती मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ चालू होता त्यामुळे वाढलेली दहशत आत्ता पोलीसांनी आपल्या चलाखी वापरून गुन्हेगाराला पकडण्यासाठी नामी शक्कल लढविली याबाबत नुकताच मिळालेल्या माहितीनुसार  दिनांक १७/०८/२०२३ रोजी बारामती शहरातील देसाई इस्टेट, कॅनॉल रोड, अशोकनगर, हरिकृपानगर तसेच निबाळकर डेअरीच्या पाठीमागे या ठिकाणचे ७ अपार्टमेंटमधील २१ बंद फ्लॅटची घरफोडी केली असून त्यापैकी दोन
फ्लॅटची घरफोडी चोरी करून २० तोळे सोन्या चांदीचे दागिने व ८०, ००० रुपये रोख रक्कम इत्यादी मुद्देमाल चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चार चोरट्यांनी चोरून नेले आहेत, त्यावरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे
गुन्हा रजि. क्र. ५७८/ २०२३ भा. द वि कलम ४५७, ३८० गुन्हा रजि. क्र. ५८६ / २०२३ भा.द वि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर दिनांक १८/०८/२०२३ व दिनांक १९/०८/ २०२३ रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा घरफोडया होऊन गुन्हा रजि. क्र. ५८९ / २०२३ भादंवि कलम ४५४, ३८० व गुन्हा रजि. क्र. ५९५/२०२३ भा. द. वि. का. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामुळे बारामती शहरातील नागरीकांमध्ये भितीदायक वातावरण तयार झाले होते.वरील मालमत्ताविषयक गुन्ह्याचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र व मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्ह्याची मोडस पाहून योग्य सुचना व मार्गदर्शन केले होते,
त्याचबरोबर गुन्हे प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने बारामती शहरात दिवसा व रात्री नाकाबंदी, कोबिंग ऑपरेशन रेकार्डवरील आरोपी चेकिंग करणे ईत्यादी कायदेशीर कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या होत्या. मा. अपर पोलीस
अधीक्षक बारामती व उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थागुशा, पुणे तसेच श्री. दिनेश तायडे पोलीस निरीक्षक, बारामती शहर व श्री. प्रभाकर मोरे पोलीस
निरीक्षक, बारामती तालुका यांचे नेतृत्वाखालील यांचेसह बारामती उपविभागातील व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे पोलीस अधिकारी व स्टाफ यांचे ८ पथके स्थापन करून गोपनीय व तांत्रिक पद्धतीने तपास करण्यास सुरुवात
केली, त्याचबरोबर गुन्हे प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने बारामती शहरात दिवसा व रात्री नाकाबंदी, कोबिंग ऑपरेशन,रेकार्डवरील आरोपी चेकिंग करणे इत्यादी कायदेशीर कार्यवाही सूरु केली असता दिनांक १७/०८/२०२३ ते
१९/०८/२०२३ चे दरम्यान खालील कामगिरी श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थागुशा, पुणे तसेच श्री.दिनेश तायडे पोलीस निरीक्षक, बारामती शहर व श्री. प्रभाकर मोरे पोलीस निरीक्षक, बारामती तालुका यांचे
नेतृत्वाखालील संयुक्त पथकांनी केले आहे.
कामगिरी क्र. १ :- बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दी मध्ये घरफोड्या करून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी मोठया प्रमाणावर घरफोडीचे गुन्हे केले होते. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये तसेच एमआयडीसी परिसर या ठिकाणी बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथक, बारामती तालुका पोलीस, तसेच आरसीपी मधील पोलीस अंमलदार यांची दिवसा रात्री पेट्रोलिंग चालू होती. दिनांक १९/८/२३ रोजी सकाळी ०९.४५ वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर एमआयडीसी बारामती येथे एक घरफोडी झाली. त्याठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपास पथकातील पोलिसांना प्राप्त झाले. तात्काळ ते सीसीटीव्ही फुटेज गस्तीवर असणारे सर्व पोलीस अंमलदार यांच्यामध्ये व्हायरल करून सदर
आरोपींचा शोध सुरू झाला. सदरचे आरोपी हे त्यांचे मोटरसायकल वरून जात असताना त्यांचा पाठलाग करून ते पळुन जावुन ते मौजे
जैनकवाडी ता. बारामती जि. पुणे येथील उसाचे शेतामध्ये लपुन बसलेनंतर बारामती तालुका, आरसीपी पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकातील पोलीस अंमलदार यांचे मदतीने उसाच्या शेताला वेडा मारून आरोपींना पळून
जाण्यास प्रतिबंध केला तसेच तसेच पोलिसांची ही मोहीम बघून स्थानिक गावकरी त्या ठिकाणी मदतीसाठी जमा झाले नंतर सदर आरोपी यांना पुर्ण उसाचे शेतात शोध घेवुन आरोपी १) नितीन दत्तात्रेय जाधव वय ३६वर्ष, २) गोपीनाथ
उर्फ सोनाजी नारायण अलगुडे वय २७ वर्ष दोघे राहणार गेवराई जिल्हा बीड यांना ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी यांनी चौकशी दरम्यान बारामती तालुका, इंदापुर, पंढरपुर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली
आहे. त्यांचेकडुन खालील प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेला मुद्देमाल हस्तगत करणे आला आहे. गु.र.नं. व कलम ५९५ / २०२३ भादवि ४५४, ३८०,४०९ / २०२३ भादवि ४५४, ३८०,८५९ /२०२३ भादवि.४५४, ३८०
सदरचे आरोपी हे पुणे जिल्हयातील बारामती शहर, बारामती तालुका, इंदापुर, व सोलापुर जिल्हयातील पंढरपुर पोलीस ठाणे येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदर गुन्हयातील अटक आरोपी हे गंभीर स्वरूपाच्या घरफोडी, दरोडा यामध्ये असल्याचे उपलब्ध सी. सी. टी. व्ही. फुटेजवरून दिसुन आल्याने सदरचे आरोपी हे इतर गुन्हयात आहेत काय बाबत तपास करून जास्तीत जास्त घरफोडी चोरी उघड होण्याची शक्यता आहे.पोलीस ठाणे बारामती शहर यांनी अटक आरोपीकडून हस्तगत केलेला मुददेमाल १,९०,००० /- कामगिरी क्र. २ :-
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये घरफोड्या करून चोरी करणाऱ्या चोरट्यांनी मोठया प्रमाणावर घरफोडीचे गुन्हे केले होते. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये तपास पथक, बारामती शहर पोलीस अंमलदार यांची दिवसा व रात्री पेट्रोलिंग चालू होती. दरम्यान बारामती शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाने गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाल्याने इसम नामे. हेमंत उर्फ बारक्या बडया पवार वय ३२ वर्षे रा. जामादार रोड बारामती, २) कुत्या रमेश पवार वय ३२ वर्षे रा. जामदार रोड ३) सुमित आदित्य पवार वय २० वर्षे रा. माळेगांव ता. बारामती जि. पुणे ४) विजय देख्या भोसले वय २० वर्षे रा. जामदार रोड बारामती यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चोकशी केली असता त्यांनी बारामती शहर पोलीस ठाणे हददीत गुन्हे केलेबाबतची कबूली दिली. त्यांचेकडून खालीलप्रमाणे दाखल
गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.१,९५,०००/- व १,६२,००० /-तसेच
गु.र.नं. व कलम ६४३ / २० भादवि ४५७,३८०
५७१/ २२३ भादवि ४५४,३८० अटक आरोपीकडून हस्तगत केलेला मुददेमाल
१६,४४० /- व ६९०,०००/- १७ तोळे सोने व ५०,०००/- रू.रोख.कामगिरी क्र. ३ :-
फिर्यादी सौ. तृप्ती सागर गोफणे ही त्यांचे राहते घरी असताना ४ अनोळखी चोरटयांनी घराचे कंपाउंड भिंतीवरून उडया मारून घरात प्रवेश फिर्यादी यांचे हातपाय बांधून, तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्यांचेजवळील रोख रक्कम ९५, ३०, ००० /- रोख, सुमारे २० तोळे वजनाचे ११, ५९,३०० /- रू. किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि
३५,०००/- किंमतीचे तीन मोबाईल असा एकूण १,०७,२४,३००/- (एक कोटी सात लाख चोवीस हजार तीनशे रूपये ) किंमतीचा मुददेमाल जबरीने चोरून नेला. bसदर गुन्हयाचा उघडकीस आणणेकामी वरीष्ठाचे वेळोवळी मार्गदर्शन घेवुन गोपनीय बातमीदारामार्फत व
तात्रिक विश्लेषनाचा आधार घेवुन गुन्हयातील आरोपी हे एम. आय. डी. सी. तील मजूर असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संशयित आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रीत करून खात्री झाल्याने १. सचिन अशोक जगदने
रा. गुणवडी, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. बारामती जि. पुणे २. रायबा तानाजी चव्हाण रा. शेटफळ हवेली ता.इंदापूर जि. पुणे ३. रविंद्र शिवाजी भोसले रा. निरावागज, घाडगेवाडी रोड, पाण्याचे टाकीजवळ ता. बारामती जि. पुणे
४. दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव रा. जिंती, हायस्कूलचे जवळ, ता. फलटण जि. सातारा ५. नितीन अर्जून मोरे रा. धर्मपूरी ता. माळशिरस जि. सोलापूर यांना वेगवेगळया परिसरातून ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी
केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदरचा गुन्हा करणेपुर्वी आरोपी ६) रामचंद्र वामन चवहाण वय ४३ वर्षे व्यवसाय ज्योतिष रा. आदंरूड ता. फलटन जि. सातारा यांचे कडुन गुन्हा करणेसाठी मुहर्त काढुन त्याचे
मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहेत. सदर गुन्हयातीन अटक आरोपीकडुन अद्याप पावेतो ७६,३२,४१० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. त्यामध्ये ६०,९७,००० रू रोख व १५, ३५,४१० रू
किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करणेत आहेत.४) कामगिरी क्रमांक ०४ बारामती शहरातील १४ घरफोडया बाबत दिनांक १७/०८/२०२३ ते आज पर्यंत बारामती शहर बारामती तालुका पोलीस ठाणे स्टाफ, स्थागुशा पथक यांचे ०८ तपास पथक तयार करून गोपनीय तंत्रिक पध्दतीने तपास केला असता
या गुन्हयातील आरोपी निष्पन्न झाले असुन लवकच गुन्हातील मुद्देमाला सह अटक कायदेशीर कारवाई करून तांत्रिक
बाबीची पुर्तता करूनच मोक्का अंतर्गत कारवाई करणेचे प्रस्तावित आहे.घरफोडीचे दाखल गुन्हे उघडकीस आणणेकामी स्वतंत्र वेगवेगळया टीम तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत
त्यांना खालील प्रमाणे सुचना देणेत आलेल्या आहेत.
१) उघडकीस न आलेले गुन्हयातील आरोपी यांचा विविध माध्यमांतून शोध घेवुन त्यांना तात्काळ अटक करणे
बाबत तपासी अंमललदार यांना देणेत आले आहेत.
२) गुन्हा घडले ठिकाणचा मोबाईल टॉवर डमडेटा काढुन त्याचे तांत्रिक विश्लेषन करुन संशयितांकडे तपास
करुन आरोपी व गेला माल हस्तगत करणेबाबत सुचना देणेत आलेल्या आहेत.
३) सर्व पोलीस स्टेशन हददीत परिणामकारक रात्रगस्त व अचानक ठिकाणे बदलुन नाकाबंदी नेमणेबाबत
तसेच मालमत्तविषयक रेकार्डवरील गुन्हेगांर, हिस्ट्रशिटर यांना रात्रगस्ती दरम्यान वेळोवेळी चेक करणेबाबत
प्रभारी अधिकारी यांना सुचित केले आहे.
 सदरचे मालमत्ता विषयक दाखल गुन्हयाना प्रतिबंधक करणेकामी केलेल्या उपाय
योजना
१. महाराष्ट्र शासनांकडुन बारामती शहर व बारामती परिसरात सी. सी. टी. व्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
त्याकरीता महाराष्ट्र शासनांकडुन निधी मंजुर झाला आहे.
२.बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गृहनिर्माण सोसायटी मधील प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठका
घेवुन त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सोसायटी परिसर व सोसायटीमध्ये सी. सी. टी. व्ही कॅमेर बसविणेबाबत तसेच
सुरक्षा गार्ड नेमणेबाबत अवाहन करणेत आले आहे.
३. आपले सोसायटी परिसरात कोणी अनओळखी व्यक्ती संशयित रित्या फिरत असताना आढळुन आल्यास तात्काळ
पोलीस ठाणेस संपर्क साधणे बाबत अवाहन करणेत आले आहे.

No comments:

Post a Comment