पिस्तोलाचा धाक दाखवून मारहान करून जबरी चोरी करणारी टोळी बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडून २४ तासात जेरबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

पिस्तोलाचा धाक दाखवून मारहान करून जबरी चोरी करणारी टोळी बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडून २४ तासात जेरबंद..

पिस्तोलाचा धाक दाखवून मारहान करून जबरी चोरी करणारी टोळी बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडून २४ तासात जेरबंद..
बारामती:- दिनांक ०७.०८.२०२३ रोजी बारामती शहराजवळ पाटस रोडलगत असणारे कृष्णा पेट्रोलीयम या
पेट्रोलपंपावरील दिनांक ०५.०८.२०२३ व दिनांक ०६.०८.२०२३ अशा दोन दिवसाची कॅश घेवून मॅनेजर मयूर बाळासाहेब शिंदे हे दिनांक ०७.०८.२०२३ रोजी १२.०० वा सुमारास बारामती सहकारी बॅक वारामती या बँकेत भरणा
करण्यासाठी कॅश घेवून त्यांचे मोटार सायकलवरून पाटस रोडने बारामती वाजुकडे जात असताना त्यांचे पाठीमागून दोन
अनोळखी इसम तोंडाला मास्क लावून स्प्लेंडर मोटार सायकवर आले व त्यांनी शिंदे यांचे मोटार सायकलला त्यांची मोटार सायकल आडवी मारून त्यांना थांबवले व त्यांचेकडील १ लाख ९९ हजार रूपये असलेली बॅग हिसकावू लागले त्यास
मॅनेजर शिंदे यांनी प्रतिकार करून ती वॅग देण्यास नकार दिला. त्यावेळी त्या दोन अज्ञात चोरट्यांनी शिंदे यांना मारहान केली व त्यांचेकडील असलेले पिस्तोल त्यांनी काढून ते मुठीच्या बाजूने शिंदे यांचे डोक्यात मारून बॅग हिसकावण्याचा
प्रयत्न केला परंतु शिंदे यांनी ती बॅग सोडली नाही त्यावेळी रोडने जाणारे येनारे लोक थांबू लागले व शिंदे हे पैसाची बॅग सोडत नाहीत म्हणुन ते दोन चोरटे पुन्हा पाटस वाजूकडे पळून गेले.त्यानंतर सदरची बातमी हि पोलीसांना समजताच बारामती शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस हे सदर घटनास्थळी गेले व जखमी मॅनेजर शिंदे यांची विचारपूस करून जखमीला औषधोपचार कामी सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आले होते व सदरची घटना वरिष्ठ अधिकारी मा. श्री अंकित गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधिक्षक श्री आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे  तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांना कळविले असता वरिष्ठ अधिकारी यांनी पुढील तपासाबाबत
योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले व तात्काळ विना विलंब तपासाची चक्रे वेगाने सूरू
सूरू झाली.या गुन्हयाचे घटनेचे गांर्भीय ओळखून मा श्री आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती व मा श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांनी भेट देवून तपासकामी मार्गदर्शन केले. त्यानंतर सदर गुन्हयाचे तपासात बारामती शहर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, बारामती तालूका, भिगवण, माळेगाव, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या मार्फत तपास सुरू करून तपासाच्या वेगवेगळया टीम तयार करून गुन्हयाचे अनुशंगाने तपास सुरू झाला व गोपनिय बातमीदार व तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे काही तासातच सदर गुन्हा उघडकीस आला व सदरचा गुन्हा हा सदर पेट्रोलपंपावरील एक कामगार
अक्षय धांईजे व त्याचे इतर दोन साथीदार यांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केला असल्याचे तांत्रीक विश्लेषन व गोपनीय बातमीदार यांचे माहितीवरून निष्पन्न करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले दोन आरोपी यांना अटक करण्यात
आली आहे . आरोपी यांचेकडून गुन्हयात वापरलेले हत्यार, वाहन व इतर मुददेमाल जप्त करण्यात आला असून इतर आरोपी यांचा गुन्हयात सहभाग आहे काय याचा तपास सुरू आहे .सदर कार्यवाही मध्ये मा. श्री अंकित गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक श्री आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि सचिन काळे, सपोनि प्रकाश वाघमारे, सपोनि दिलीप पवार, सपोनि गंधारे, सपोनि गावडे, पोसई अमित सिदपाटील, तसेच सहाय्यक फौजदार रविराज कोकरे, बाळासाहेव कारंडे, पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राजू मोमीन, सागर क्षीरसागर,अजित भुजबळ,विजय कांचन, अजय घुले, बाळासाहेव खडके, अतुल डेरे, गुरू जाधव, रामदास वावर, काशीनाथ राजापुरे व बारामती शहर पोलीस स्टेशनकडील अक्षय शिताफ, मनोज पवार, सागर जामदार, दशरथ इंगोले, यशवंत कोकणे यांनी सदरची संयुक्तीक कामगीरी केलेली आहे.
पवार,सदर गुन्हयातील आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांचेवर या पुर्वी विविध ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment