आता राजकीय,सामाजिक लढाई सोशल मीडियावरच -आमदार श्रीकांत भारतीय
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी):- सोशल मीडिया समजून घेण्यासाठी भारताचा सोशल डी एन ए समजल्याशिवाय याचा प्रभावीपणे वापर करता येणार नाही. सध्याच्या काळातील राजकीय, सामाजिक, पत्रकार व कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट फेसबुक, ट्विटर हे फोटोशॉप झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात पुर्वी मोठ्या स्क्रीनची खूप चर्चा होती.नंतर घरात छोटा स्क्रीन आला.
मात्र आता सगळी सामाजिक, राजकीय लढाई ही मोबाईल वरील छोट्या स्क्रीनवर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी तो समजून घेणे आवश्यक आहे. असे स्पष्ट मत भाजपचे महामंत्री व विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे लोकमत मीडिया ग्रुप चा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम अवार्ड मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा सत्कार आणि पत्रकारांसाठी आयोजित एक दिवशी सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संपादक धनंजय लांबे,चंदुलाल बियाणी, डॉ प्रभू गोरे व राज्यभरातील प्रमुख पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment