हभप प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)यांनी किर्तनातून मांडली मानवी जीवनावर होत असलेल्या दुष्परिणामाची गाथा..
बारामती:- क्षत्रियनगर,टकार कॉलनी येथील श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्ताने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवानिमित्त दि.9 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर ) यांचे सायं. 5.30 वा. पाटस रोड,वृंदावन लॉन्स मंगल कार्यालय देशमुख चौक बारामती याठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने टाळकरी उपस्थित होते यावेळी इंदोरीकर महाराज यांनी किर्तनातून समाज प्रबोधन करीत असताना मानवी जीवनावर कसे दुष्परिणाम होत असतात,आपल्यात होत असलेली विचारांची घालमेल,मानव क्रूरतेकडे वाटचाल करीत आहे, अश्या अनेक समाज मनावर होत असलेल्या विपरीत परिणामाला सुधारले पाहिजे होणार आहे. या सर्व कार्यक्रमादरम्यान सिद्धिविनायक विकास प्रतिष्ठान च्या विश्वस्त मंडळीचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल नामदेव गायकवाड,राजेंद्र निगडे,बाळासाहेब(अनिल) गायकवाड,संजय जाधव,गणेश गायकवाड, शेखर गायकवाड,संजय गायकवाड,लक्ष्मण जाधव, संजय शेठ गायकवाड, सतीश गायकवाड,सुनील जाधव, मिलिंद गायकवाड यांनी केले असून गेली 25 वर्षे प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक,धार्मिक,गरजूंना मदत, सामुदायिक लग्न सोहळा,सांस्कृतीक कार्यक्रम असे अनेक उपक्रम अध्यक्ष सह त्यांच्या सोबत गेली 25 वर्षे हिरहिरीने सहभागी घेतलेले पदाधिकारी सदस्य राबवित आहे,यासोबत क्षत्रिय तरुण मंडळ चे सर्व पदाधिकारी सदस्य यांची मोलाची साथ असते, यावेळी संजय जाधव(शिक्षण अधिकारी),ओंकार जाधव(सामाजिक), संतोष जाधव(पत्रकार),सुभाष जाधव(सरपंच) व मान्यवर समाज बांधव, मित्रपरिवार, महिला भगिनी व भक्त भाविकांची मोठी गर्दी जमली होती.सुत्रसंचालन महेंद्र सोपान गायकवाड यांनी केले.
No comments:
Post a Comment