बारामती:- फक्त दिड दिवस शाळा शिकलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सोसलेल्या वेदनेमुळेच त्यांच्या लेखणीला तलवारी ची धार होती त्यातून त्यांनी कष्टकरी समाजांचे प्रश्न जगासमोर मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली...असे प्रतिपादन केले , महापुरुषांची जयंती उत्सव पुढील पिढीला प्रेरणा म्हणून साजरा करणे गरजेचे आहे वेळेचा सदुपयोग करता ,आपल्या इतिहासात फक्त अभ्यासापुर्त न वापरता त्याचा उपयोग वर्तमान व भविष्यासाठी करता योग्य दिशेने विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा , असे मत श्री नितीन दादा शेंडे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष यांनी व्यक्त केले,अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात आण्णा भाऊ साठे 103 व्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा,अजित दादा पवार यांच्या 64 वा वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय वस्तू , व खाऊ वाटप कार्यक्रमांत आला, यावेळी श्री पोपटराव गावडे बारामती दूध संघ चेअरमन, सौ प्रतिभा परकाळे अंजनगाव विद्यमान सरपंच, सौ कल्याणी ताई वाघमोडे क्रांती शौर्य सेनेचे अध्यक्ष, दिलीप परकाळे माजी सरपंच, माणिक मोरे मार्केट यार्ड माजी उपसभापती, सुरेश साळुंखे सर टी सी कॉलेज माजी प्राचार्य,
जालींदर वायसे , सुभाष परकाळे तंटामुक्ती अध्यक्ष, डॉ सुजित वाघमोडे, रणवरे सर मुख्याध्यापक , जमदाडे सर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत कुचेकर सामाजिक कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आभार दादा कुचेकर ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष यांनी मानले.यावेळी पारधी समाजातील युवक कमलेश भोसले ,याने मेहनतीने तसेच गणेश अवघडे या दोघांचेही पोलीस पदावरती निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला..
No comments:
Post a Comment