धक्कादायक..व्हिडीओ क्लिपमुळे प्रकार उघड;धमकी देऊन 'ती' अल्पवयीन
पुणे:- महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना ऐकल्या आहे मात्र महिलेनेच अल्पवयीन मुलावर जबरदस्तीची घटना घडली असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांकडे तक्रार देण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा
धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा
प्रकार 28 वर्षीय महिलेने केला असून याबाबत
17 वर्षाच्या पीडित मुलाने कोंढवा पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 28 वर्षीय महिलेवर पोक्सो कलम (Pocso Act)3, 4, 5 (एन), 5 (एल), 6 नुसार गुन्हा
दाखल केला आहे. हा प्रकार 1 मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत कोंढवा बु. येथे दोन ते तीन वेळा घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फि.अल्पवयीन मुलगा आणि आरोपी महिला कोंढवा बु. परिसरात राहतात. दोघांची घरे जवळजवळ असून महिलेच्या पतीचे
कोरोनामुळे निधन झाले आहे. दरम्यान, फिर्यादी मुलगा हा अल्पवयीन आहे. याची माहिती असतानाही आरोपी महिलेने त्याच्यासोबत जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसात देण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी मुलाची इच्छा नसताना जबरदस्तीने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. आरोपी महिलेने अल्पवयीन मुलासोबत शरीर संबंध ठेवत असताना व्हिडिओ चित्रित करण्यास भाग पाडले.मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत आरोपी महिलेने दोन ते तीन मुलासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.दरम्यान, आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडीओ असल्याचे समजताच मुलाने
हा प्रकार घरच्यांना सांगितला.घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेविरुद्ध तक्रार केली.पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबर करीत आहे.
No comments:
Post a Comment