RTI कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यावरुन प्रशासकीय भवनासमोर निषेध आंदोलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 4, 2023

RTI कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यावरुन प्रशासकीय भवनासमोर निषेध आंदोलन..

RTI कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यावरुन प्रशासकीय भवनासमोर निषेध आंदोलन..
बारामती:- बारामती प्रशासकीय भवन येथील तहसील कार्यालयात तक्रारी अर्जाचा
पाठपुरावा करण्यासाठी तहसील कचेरीत
गेल्यानंतर अर्जदाराशी तहसीलदार यांनी
अपमानास्पद वागणूक दिल्या कारणाने
प्रशासकीय भवनासमोर निषेध आंदोलन
करण्यात आले,माहिती अधिकार कार्यकर्ता भास्कर विजय दामोदरे हे तक्रार अर्जाच्या
अनुषंगाने अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी
तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे त्यांच्या
दालनात गेले असता तहसीलदार यांनी
बेजबाबदार वक्तव्य करीत दालनातून बाहेर
काढले त्या विरोधात एक दिवशीय निषेधार्थ
आंदोलन करत निषेध केला यावेळी दि
बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका
प्रमुख अनिकेत मोहिते तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तर या प्रकरणी उपविभागीय अधिकारी वैभव नवाडकर यांना तक्रारी निवेदन दिले असून योग्य न्याय न मिळाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी पासून अमरण उपोषण करणार
असल्याबाबतची माहिती दामोदरे यांनी बोलताना दिली.बारामतीचे तहसीलदार यांनी त्यांच्या
पदाचा गैरवापर करून मला त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर निघा अशा शब्दात
मला हाकलून दिले. त्यामुळे माझा अपमान
झाला त्यामुळे मला मानसिक तणावाखालून
जावे लागले. तसेच संबंधित तहसीलदार हे दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास
असमर्थ असल्याचे दाखवून देत आहेत. मी
त्या तक्रारीवर काय कारवाई केली हे विचारले असता संबंधित तहसीलदार यांचे असे
म्हणणे आहे की, मी संबंधितांकडून
अनधिकृत मुरूम उत्खननाची फक्त रॉयल्टी
भरून घेणार आहे. मी त्यांना कसल्याही
दंड करणार नाही दंड आकारणार नाही.
तुम्हाला काय करायचे ते करा मी
कुठल्याही नियम अधिनियमांना मानत
नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने
दिलेल्या परिपत्रकाचा अवमान करून
संबंधित तहसीलदार हे शासनाचे नुकसान करून उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालत
असल्याची तक्रार दिली आहे.संबंधित ठेकेदाराने पंधराशे ब्रास मुरूम उत्खननाची महसूल प्रशासनाकडून परवानगी घेतली असून, प्रत्यक्ष ३ हजार ५०० ब्रास मुरूम उत्खनन केले आहे. त्यामुळे उरलेल्या उत्खननाचे शासकीय नियमाने
रॉयल्टी व दंड आकारावा व शासकीय
महसूल घ्यावा यासाठी आम्ही महसूल
प्रशासनाशी भांडत आहोत. ही शोकांतिका
असल्याचे मत आंदोलक भास्कर दामोदरे
यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment