बारामतीच्या उंडवडी सुप्यात 14 गावातील
बारामती:-खडकवासला कालव्यातून शिर्सुफळच्या तलावात शिरसाई योजनेसाठी पाणी सोडावं याकरिता बारामती तालुक्यातील 14 गावातील शेतकरी उंडवडी सुपे येथे 22
सप्टेंबर पासून चक्री उपोषण केले आहे. उंडवडी सुपे गावातील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर हे शेतकरी चक्री उपोषण सुरू असून या
शेतकऱ्यांच्या इशाऱ्याने प्रशासनाचे धाबे
तालुक्याच्या जिरायती भागातील काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसला आहे. बारामती तालुक्यातील ज्या 14 गावांमध्ये शिरसाई योजनेचे पाणी येते, त्या भागात संपूर्ण पावसाळ्यात पाऊस पडलेला नाही.
उभी पिके करपून गेली आणि खरीपाची
पिके दुबार पेरणीनंतरही वाया गेली आहेत.
संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्यामुळे
शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, येत्या
उन्हाळ्यात काय करायचे या प्रश्नाची चिंता
शेतकऱ्यांपुढे आहे. फक्त उन्हाळ्याचीच
नाही तर येत्या दहा पंधरा दिवसापासून
काय होणार याचीही चिंता प्रत्येक गावात
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे. अशा
परिस्थितीत या भागातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाने खरीप व रब्बी हंगामासाठी शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडावे अशी मागणी अनेकदा केली मात्र पाटबंधारे विभागाने
फक्त पाणी सोडण्याच्या तारखा शेतकऱ्यांना दिल्या पुढे काहीच घडले नाही त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आता हे चक्री उपोषणाचे मार्ग अवलंबवला असल्याची माहिती देण्यात आला..
No comments:
Post a Comment