मारहाण करून खिशातील 3000/- रुपये जबरीने काढून घेणारे दोघेजण अटकेत.. बारामती:-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी बारामती शहर पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपी जेरबंद
दिनांक 06/09/2023 रोजी यातील फिर्यादी यांचे पती सायंकाळी 06.15 ते 23.00 वाजनेचे सुमारास आंबेडकर स्टेडियम जवळ भारत
एंटरप्रायजेस दुकानाच्या पायरीजवळ बारामती येथे बसलेले असताना दोन आनोळखी इसमांनी मारहाण करून डोक्याला उजव्या बाजुस जखम करुन त्याचे खिशातील 3000/- रुपये रोख रक्कम जबरीने काढून घेऊन चोरून नेले बाबत.बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 678/2023 IPC 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून इसम नामे 1)दिनेश हनुमंत मिसाळ वय वर्ष 25 राहणार आंबेडकर स्टेडियम शेजारी बारामती. तालुका बारामती जिल्हा पुणे 2) सुधीर मारुती साळुंखे वय 31 रा.बेलवाडी ता. इंदापूर जिल्हा पुणे यांस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केला असल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आरोपी यांस बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक श्री.अंकित गोयल,अप्पर पोलिस अधिक्षक सो आनंद भोईटे,एस.डी.पी.ओ बारामती श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,PSI सिदपाटील,ASI रविराज कोकरे,ASI बाळासाहेब कारंडे,पो हवा स्वप्निल अहिवले,पो.हवा अभिजीत एकशिंगे,पो हवा राजू मोमीन,पोलीस हवालदार अतुल डेरे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment