धक्कादायक..पोलीस अधिकारी आहे मी मोठा म्हणत महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत 35 लाख रु उकळणाऱ्या निवृत्त पोलीस
दौंड:-महिला अत्याचाऱ्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे, आपल्या खात्याचा गैरवापर करून अत्याचार करणारी मंडळी खूप वाढली असल्याचे दिसत आहे, नुकताच एका निवृत्त
पोलीस कर्मचाऱ्याने महिलेसोबत जबरदस्तीने
शारीरिक संबंध ठेवून तिच्याकडून वेळोवेळी 35 लाख रुपये घेतले.याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मनीष बिलोन ठाकूर (रा. डिफेन्स कॉलनी, दौंड) याच्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.
मनीष ठाकूरला यवत पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपी मनिष ठाकूर याने मी मोठा पोलीस अधिकारी आहे, असे पीडित महिलेला सांगत होता. त्यामुळे तिने अनेक दिवस भीतीपोटी तक्रार केली नाही. अखेर मानसिक त्रास सहन न
झाल्याने तिने यवत पोलीस ठाण्याततक्रार केली. मनीष ठाकूर याने यवत झाल्याने तिने यवत पोलीस ठाण्यात तक्रार केली. मनीष ठाकूर याने यवत परिसर व दौंड तालुक्यात कोणाची धमकी देऊन फसवणूक केली असेल तर त्यांनी यवत पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन
पोलिसांनी केले आहे.
No comments:
Post a Comment