पुणे जिल्ह्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले
पुणे :-पुणे जिल्ह्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असलेल्या 5 सराईत गुन्हेगारांवर
परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपारीची कारवाई केली आहे पोलिस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 5 जणांना पुणे शहर , पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्हयातून
तडीपार करण्यात आले आहे. तडीपार आरोपींमध्ये करण्यात आलेल्या बंडगार्डन
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे नटी उर्फ रोहन उर्फ ऋषिकेश मोहन निगडे(वय-28), अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या (वय-23), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय-27), अजय उर्फ
सोन्या गिरीप्पा दोडमणी (वय-27 सर्व
रा. ताडीवाला रोड, पुणे) तसेच महाराष्ट्र
पोलीस कायदा कलम 56 नुसार आशिष सुनिल मापारे (वय-27 रा.आळंदी म्हातोबाची, ता. हवेली सध्या रा. प्रायव्हेट रोड, पुणे) यांच्यावर
तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ दोन मधील पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील खुनाचा प्रयत्न,खंडणी, दरोडा, दुखापत,जबरी चोरी, बलात्कार,विनयभंग, बाल
लैंगिक अत्याचार , पुरावा नष्ट करणे, दहशत माजवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे,शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा म्हणून संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस
निरीक्षकांनी आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठवला होता.प्रस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर 5 गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम Act) 55 व 56 प्रमाणे हद्दपार
करण्यात आले आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार ,सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली आहे.आगामी काळात देखील झोन दोन मधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सक्रिय
गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment