घृणास्पद..85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार;
दिल्ली:-धक्कादायक व लज्जास्पद घटना नुकतीच घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की,दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील नेताजी
सुभाष प्लेसमध्ये घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.
रिपोर्टनुसार, घरात झोपलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्यानंतर या तरुणाने तिचे ओठ ब्लेडने कापले. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी आकाशला अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजता ही महिला घरात झोपली होती. आरोपी
आकाशने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. तसेच ब्लेडने तिचे ओठ कापले. महिलेच्या चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर अनेक
जखमा झाल्या आहेत. डीसीडब्ल्यूच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी एका ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागितली आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली पोलिसांना या
प्रकरणाची इतर माहिती महिला आयोगासोबत शेअर करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment