पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान परिसंवाद संपन्न. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 15, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान परिसंवाद संपन्न.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान परिसंवाद संपन्न.
बारामती:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान परिसंवाद संपन्न झाले. 
यावेळी अवयवदान अभियानाच्या नोडल अधिकारी डॉ प्रज्ञा भालेराव, समन्वयक अधिक्षक डॉ तुषार सावरकर,
डॉ रेणुका बुनगे वरीष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी, व डॉ अनघा लोंढे, वालचंद नगर येथील भूलतज्ञ यांनी परिसंवादात मार्गदर्शन केले. 
डॉ अनघा लोंढे यांनी अवयव दान, अवयव प्रत्यारोपण, 
अवयवदानाचे प्रकार, मेंदू मृत अवस्था व त्या दरम्यान कोणते अवयव दान करता येऊ शकतात व ग्रीन कॉरिडॉर संकल्पना स्पष्ट केल्या. 

डॉ रेणू यांनी जिवंत दात्या कडून कोणकोणते अवयव दान करता येतात, मेंदू मृत अवस्थेत कोणते अवयव दान करता येतात, अवयवदान व प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या मर्यादांवर मार्गदर्शन केले. 

डॉ तुषार सावरकर यांनी अवयव दानाची गरज, जीविती दाता कोण असू शकातो व जीवित प्रत्यारोपणाचे प्रकार, अवयव दानासाठी पात्रता, झोनल ट्रान्सप्लांट कोर्डीनेशन कमिटी व तीची भूमिका, जनजागृतीची आवश्यकता, अवयव प्रत्यारोपणाचे नियम, कायदे इत्यादींवर प्रकाश टाकला. 

नोडल अधिकारी डॉ प्रज्ञा भालेराव यांनी सादरीकरणाद्वारें अवयव दान व प्रत्यारोपणाची सध्या स्थिती बाबत विवेचन केले. तसेच त्यांनी परिसंवादा आधी व नंतर सहभागी विद्यार्थ्यांचे जनजागृतीबाबत प्रश्न मंजुषे द्वारे परीक्षण केले. त्यात परिसंवादानंतर विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर झाल्याचे व ज्ञानात भर पडल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले.

 कार्यक्रमात डॉ अंजली श्येटे उपअधिष्ठाता,  डॉ अंजली पाटील विभाग प्रमुख शरिररचना शास्त्र विभाग, डॉ गीतांजली सुडके सहयोगी प्राध्यापिका शरिररचना शास्त्र विभाग,  डॉ नेहा कांबळे सहाय्यक प्राध्यापिका, भूलशास्त्र विभाग, संध्या नाईक, विनायक  साखरे,  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment