धक्कादायक..डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस,नवजात बाळाचा मृत्यू;बारामतीत गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 19, 2023

धक्कादायक..डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस,नवजात बाळाचा मृत्यू;बारामतीत गुन्हा दाखल..

धक्कादायक..डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस,नवजात बाळाचा मृत्यू;बारामतीत गुन्हा दाखल..
 बारामती :- डॉक्टर हे देव म्हणून गणले जातं कारण आजारपणात देवासारखे धावून येतात पण अलीकडे सर्वस्वी पैसा हाच एकमेव माध्यम झालं असल्याचे दिसत आहे गोरगरिबांना नाईलाजाने ह्या गोष्टीना सामोरे जावं लागतं नुकताच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, निष्काळाजीपणा व हलगर्जीपणामुळे नवजात बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहरातील शिवानंदन
हॉस्पिटलमधील डॉ. तुषार गोविंद गदादे यांच्यावर
अखेर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, दि 22 डिसेंबर 2022 रोजी पद्मिनी गोपाळ गायकवाड यांना शिवानंदन हॉस्पिटल येथील डॉक्टर तुषार गदादे यांच्याकडे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. डिलिव्हरी नॉर्मल होणार नसून सिजर ऑपरेशनद्वारे प्रसूती करावी लागेल असे डॉक्टरनी सांगितले आणि ते बाहेर गेले. त्यानंतर सदर महिलेस प्रसुतीकळा सुरू झाल्या व क्लिष्ट पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर बाळ गुदमरले. या सर्व प्रक्रियेत डॉक्टरांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे बाळाचा गुदमरुन मृत्यू झाला.याबाबतची तक्रार बारामती शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे त्री सदस्य समिती नेमून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांनी दिले.त्रिसदस्य समितीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. प्रसूती काळात डॉक्टर स्वतः तेथे हजर नसल्याचे आढळून आले. तसेच रुग्णालयात डॉक्टर किंवा नर्सही उपस्थितीत नव्हते असे उपलब्ध कागदपत्रावरून स्पष्ट होत असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment